महाराष्ट्राचा फेवरेट कोण?' सोहळ्यात कलाकारांची मांदियाळी

झी टॉकीजच्या भव्यदिव्य 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण?' या सोहळ्यातून कलाकारांना त्यांच्या कामाची पोचपावती मिळते.

Updated: Dec 19, 2021, 06:15 PM IST
महाराष्ट्राचा फेवरेट कोण?' सोहळ्यात कलाकारांची मांदियाळी title=

मुंबई : झी टॉकीजच्या भव्यदिव्य 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण?' या सोहळ्यातून कलाकारांना त्यांच्या कामाची पोचपावती मिळते. दरवर्षी हा पुरस्कार सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडतो. यावर्षी पुन्हा एकदा नव्या उत्साहासह हा धमाकेदार सोहळा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यंदाचा हा सुवर्णदशक सोहळा म्हणून साजरा केला गेलाये.

सुवर्ण दशक सोहळ्यामध्ये 12 श्रेणींमध्ये पुरस्कार दिले गेले. यामध्ये फेवरेट चित्रपट, फेवरेट दिग्दर्शक, फेवरेट अभिनेता, फेवरेट अभिनेत्री, फेवरेट सहाय्यक अभिनेता, फेवरेट सहाय्यक अभिनेत्री, फेवरेट खलनायक, फेवरेट गीत, फेवरेट गायक, फेवरेट गायिका आणि फेवरेट पॉप्युलर फेस, फेवरेट स्टाईल आयकॉन असे पुरस्कार देऊन अनेक कलाकारांचा गौरव करण्यात आला आहे.

रेड कार्पेटवर दिग्गज कलाकारांची मांदियाळी तर पाहायला मिळालीच, पण त्याचबरोबरीने तारे तारकांचा ग्लॅमरस अवतार प्रेक्षकांचं लक्षवेधून घेणारा ठरला. यावेळी सोहळ्यासाठी गोल्डन- ब्लॅक ही थीम ठेवण्यात आली होती. हा भव्यदिव्य 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण? हा सोहळा तुम्हाला २६ डिसेंबर २०२१ रोजी संध्याकाळी झी टॉकीझवर पहायला मिळेल.