दिल दिया गल्लां - टायगर जिंदा है चित्रपटातील दुसर्‍या गाण्याची झलक

'टायगर जिंदा है' चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच या चित्रपटाबाबत रसिकांची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. 

Dipali Nevarekar Dipali Nevarekar | Updated: Nov 27, 2017, 12:59 PM IST
दिल दिया गल्लां - टायगर जिंदा है चित्रपटातील दुसर्‍या गाण्याची झलक title=

मुंबई : 'टायगर जिंदा है' चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच या चित्रपटाबाबत रसिकांची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. 

सुरवातीला चित्रपटाचा ट्रेलर आणि त्यानंतर आलेले  'स्वॅग से स्वागत' हे चित्रपटातील पहिलं गाण  युट्युबवर धुमाकूळ घालत आहे. या  दोन्ही व्हिडियोंनी युट्युबवर लाईक्स आणि व्हुजचे रेकॉर्ड मोडले आहेत. 

दुसरं गाणं रसिकांच्या भेटीला 

पाच वर्षानंतर सलमान  खान आणि कॅटरिना कैफ या जोडीचा रोमान्स आणि अ‍ॅक्शन पाहता येणार आहे. त्यामुळे रसिकांमध्ये उत्सुकता आहे. 'स्वॅग से स्वागत' गाण्यामध्ये या दोघांचा कूल अंदाज पाहिला. आता रोमॅन्टिक अंदाजातील गाणं लवकरच रसिकांच्या भेटीला येणार असल्याची शक्यता आहे.  

'दिल दिया गल्लां' हे पुढील गाणं ? 

चित्रपटाचे दिग्दर्शक अली अब्बास यांनी ट्विटर अकाऊंटवर सलमान -कॅटरिनाचा ' टायगर जिंदा है' चित्रपटातील एक खास फोटो शेअर केला आहे. यामध्ये कॅटरिना मोहक गाऊनमध्ये तर सलमान खान सूटमध्ये आहे. 

 

 

'दिल दिया गल्लां'  इतकेच कॅप्शन त्याने दिले आहे. त्यामुळे हेच चित्रपटातील पुढील  गाणं असेल असा अंदाज आहे. 

२२ डिसेंबरला चित्रपट भेटीला 

'टायगर जिंदा है' हा ' एक था टायगर' चित्रपटाचा सिक्वेल आहे. सलमान आणि कॅटरिना या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. २२ डिसेंबरला ख्रिस्मसच्या सुट्ट्यांमध्ये हा चित्रपट रसिकांसाठी पर्वणी ठरणार आहे. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कामगिरी करणार असल्याचा अंदाज आहे