नकली साप दाखवून घाबरवणार्‍याचा सनी लिऑनने घेतला 'असा' बदला

  अभिनेत्री सनी लिऑनचा हॉट अंदाज अनेकदा पाहिला असेल पण एका नकली सापामुळे सनीची घाबरगुंडी कशी उडते ? हे दाखवणारा एक व्हिडिओ काल सोशल मीडियावर झपाट्याने पसरत होता. 

Dipali Nevarekar Dipali Nevarekar | Updated: Nov 27, 2017, 11:10 AM IST
नकली साप दाखवून घाबरवणार्‍याचा सनी लिऑनने घेतला 'असा' बदला  title=

मुंबई :  अभिनेत्री सनी लिऑनचा हॉट अंदाज अनेकदा पाहिला असेल पण एका नकली सापामुळे सनीची घाबरगुंडी कशी उडते ? हे दाखवणारा एक व्हिडिओ काल सोशल मीडियावर झपाट्याने पसरत होता. 

कुणी केली सनीची मस्करी 

सनी लिऑन  सध्या ' तेरा इंतजार' या आगामी चित्रपटाच्या तयारीमध्ये आहे. या चित्रपटामध्ये सनी सोबत अरबाज खानदेखील आहे. एका सेटवर सनीची मस्करी करण्यासाठी तिच्यासोबत टीमने स्नेक प्रॅन्क केला होता. 

सनीच्या हातावर एक नकली साप टाकला. त्यानंतर सनी घाबरली आणि आत पळत सुटली. काही वेळाने तो साप नकली असल्याचं तिला समजले. पण या मस्करीचा बदला घेण्यासाठी आता सनीनेही तयारी केली आहे.

सनीने कसा घेतला बदला ? 

ट्विटरवर 'रिव्हेंज' असं कॅप्शन लिहून तिने एक व्हिडियो शेअर केला आहे.  सनीच्या दोन्ही हातामध्ये केक आहे. ज्या व्यक्तीने नकली साप दाखवून तिला घाबरवलं त्याच्या चेहर्‍यावर सनीने दोन केक फासले आहेत. 

 

'तेरा इंतजार' पुढील महिन्यात -

सनी लिओनी आणि अरबाझ खानचा ' तेरा इंतजार' हा चित्रपट पुढील महिन्यात रसिकांच्या भेटीला येणार आहे. अरबाझसोबत काम करण्याची संधी खुपच छान होती. पुन्हा एकत्र प्रोजेक्ट करायला आवडेल अशी माहितीदेखील सनी आणि अरबाझने दिली आहे.