मुंबई : बॉलिवूडमध्ये खान यांची वेगळीच चलती असते. या तिघांच्या सिनेमांनी वेगवेगळे रेकॉर्ड रचले आहेत.
याच आठवड्यात प्रदर्शित झालेल्या सलमान खानच्या 'टायगर जिंदा है' ने असे काही रेकॉर्ड रचले आहेत. ज्यामुळे तो आता सुपरस्टार खान्समध्ये देखील नंबर 1 चा खान बनला आहे. सलमान खान पहिला असा सुपरस्टार आहे ज्याचे 12 सिनेमे तब्बल 100 करोडहून अधिक कमावले आहेत. टायगर या सिनेमाने 3 दिवसांत तब्बल 100 करोडहून अधिक किंमत कमावली आहे. आणि सलमान खान यंदाही अधिक कमाई करणारा सुपरस्टार ठरला आहे.
Boxoffice Zinda Hai: 2017 ends with a Big Bang... My thoughts on #TigerZindaHai BO performance on Bollywood Hungama #TZH... Link: https://t.co/HXUcyUoH35 pic.twitter.com/SLVgVO796X
— taran adarsh (@taran_adarsh) December 26, 2017
ट्रेड अॅनलिस्ट तरूण आदर्शने आपल्या ट्विटरवर ही आकडेमोड केली आहे. टायगर हा 12 वा सिनेमा ठरला ज्याने 100 करोडहून अधिक कमाई केली आहे. एवढंच नाही, तर सलमान खानचे 2 सिनेमे 300 करोड रुपयाच्या घरात पोहोचलेल्या आहेत. बजरंगी भाईजान 320 करोड रुपये तर सुल्तान 300 करोड रुपये कमाई केली आहे.
#TigerZindaHai #TZH is Salman Khan’s 12th film to cross ₹ 100 cr mark... The HIGHEST by any actor…
Highest grosser: #BajrangiBhaijaan [₹ 320.34 cr]
Two films in ₹ 300 cr Club: #BajrangiBhaijaan [₹ 320.34 cr] and #Sultan [₹ 300.45 cr]
India biz.— taran adarsh (@taran_adarsh) December 25, 2017
टायगरच्या पहिल्या तीन दिवसांच्या गल्याबद्दल बोलायचं झालं तर... पहिल्या तीन दिवशी 114.93 करोड रुपये कमाई केली आहे. तर या अगोदर सुल्तान या सिनेमाने पहिल्या तीन दिवशी 105 करोड रुपये कमाई केली आहे. तर बजरंगी भाईजानने वीकेंडच्या दिवसांत 102 करोड रुपये कमाई केली आहे.