रक्तबंबाळ Tiger Shroff चा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत

टायगरला नक्की झाल तरी काय? रक्तबंबाळ अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते घाबरले  

Updated: Jul 3, 2022, 02:32 PM IST
रक्तबंबाळ Tiger Shroff चा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत title=

मुंबई : जबरदस्त डान्सने सर्वांना ठेका धरायला लावणारा, फिटनेससाठी चाहत्यांना टिप्स देणारा अभिनेता टायगर श्रॉफ कायम चर्चेत असतो. टायगरचा नवा सिनेमा कधी प्रदर्शित होतो, यासाठी प्रेक्षक देखील प्रतीक्षेत असतात. टायगर सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील त्याच्या रोजच्या आयुष्यातील चाहत्यांसोबत शेअर करत असतो. अभिनेत्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर कायम व्हायरल होत असतात. पण आता टायगरचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अभिनेता रक्तबंबाळ परिस्थितीत दिसत आहे. 

बूमरँग स्टाइल व्हिडिओमध्ये टायगरचा चेहरा रक्तबंबाळ झाल्याचं दिसत आहे. त्याच्या चेहऱ्यातून रक्त टपकत असून जखमांनी चेहरा पूर्ण भरल्याचं दिसत आहे. अभिनेत्याला रक्त बंबाळ परिस्थितीत पाहून त्याचे चाहते चिंतेत आले असतीलचं..

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पण घाबरण्याचं काहीही कारण नाही, कारण टायगर रक्तबंबाळ झाला नसून व्हिडीओ गणपत पार्ट 1 या सिनेमाचं शूटिंगचा आहे. सिनेमात ऍक्शन सिन असल्यामुळे टायगरच्या चेहऱ्याला मेकअप करण्यात आल्याचं समोर येत आहे. अभिनेत्याला दुखापत झालेली नाही. 

टायगरच्या आगामी सिनेमात त्याच्यासोबत अभिनेत्री क्रिती सेनॉनची मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे सिनेमात टायगरचे ऍक्शन सिन आणि क्रितीसोबत केमिस्ट्री पाहाण्यासाठी चाहते प्रतीक्षेत आहेत.