'ही' गोष्ट कधीच करणार नाही, शर्मिला टागोर यांच्या पतीने निकाहनाम्यात घेतलेलं लिहून! हजारो कोटींची जबाबदारी सैफवर नाही तर...

Sharmila Tagore Banned From Doing This thing : शर्मिला टागोर यांच्या पतीनं लग्नाच्या आधीच घातली होती ही अट...

दिक्षा पाटील | Updated: Dec 8, 2024, 01:38 PM IST
'ही' गोष्ट कधीच करणार नाही, शर्मिला टागोर यांच्या पतीने निकाहनाम्यात घेतलेलं लिहून! हजारो कोटींची जबाबदारी सैफवर नाही तर... title=
(Photo Credit : Social Media)

Sharmila Tagore Banned From Doing This thing : शर्मिला टागोर यांचा आज 80 वा वाढदिवस आहे. त्यांनी मंसूर अली खान पतौडी यांच्याशी लग्न केलं होतं. पण तुम्हाला माहितीये का की मंसूर अली खान यांनी शर्मिला यांच्यावर एका गोष्टीचा बॅन लावला होता. याचा खुलासा स्वत: शर्मिला यांनी एका मुलाखतीत केला होता. आज शर्मिला या 5 कोटींच्या संपत्तीच्या मालकीन आहेत. त्यातून 2700 कोटींची संपत्ती ही लेक सबा सांभाळते. 

मंसूर अली खान यांच्याशी लग्न करण्यासाठी मंसूर अली खान यांनी इस्लाम धर्म स्विकारला आणि इतकंच नाही तर नाव बदलून आयशा सुल्ताना देखील केलं. टायगर पतौडी यांच्याशी लग्न करताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. याविषयी देखील त्या मुलाखतीमध्ये बोलल्या आहेत. त्याशिवाय त्यांनी यावेळी हे देखील सांगितलं की त्यांच्या संपूर्ण संपत्तीची जबाबदारी ही त्यांनी मुलगा सैफ नाही तर लेकीला दिली आहे. 

शर्मिला यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की 'त्या दोघांची भेट ही एका पार्टीत झाली. त्यानंतर ते भेटू लागले होते. शर्मिला यांच्या मनात जागा निर्माण करण्यासाठी टायगर पतौडी यांनी शर्मिला यांच्या घरी 8 फ्रिज देखील पाठवले होते. तरी देखील शर्मिला हो म्हणाल्या नाही. तरी सुद्धा मंसूर अली खान यांनी त्यांचे प्रयत्न हे सुरुच ठेवले.' 

कपिल सिब्बल यांना दिलेल्या मुलाखतीत शर्मिला टागोर यांनी सांगितलं की 'मंसूर अली खान पतौडी हे प्रयत्न करत राहिले. त्यानंतर हळू हळू त्यांना ही प्रेम झालं आणि लग्नापर्यंत विषय पोहोचला. मंसुर अली खान पतौडी यांच्याशी लग्न करण्याचं ठरवल्यानंतर पतौडी यांनी शर्मिला यांच्यासमोर एक अट ठेवली. माझ्या निकाहनाम्यात लिहिलं होतं की तू कधीच क्रिकेटविषयी काही बोलू शकत नाही आणि नाही कधीच कोणत्या स्टेडियममध्ये क्रिकेट पाहायला जाशील.' त्यावेळी त्यांनी हसत सांगितलं की 'इच्छा असली तरी त्या क्रिकेटवर काही बोलू शकत नाही कारण त्यांच्यावर बॅन लावण्यात आला आहे.' 

हेही वाचा : एआर रहमान करिअरला ब्रेक? घटस्फोटानंतर मोठा निर्णय? लेक खतीजा म्हणाली...

शर्मिला आणि मंसुर अली खान पतौडी यांनी तीन मुलं आहेत. एक मुलगा सैफ, मुली सोहा आणि सबा. सैफ आणि सोहानं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं तर लेक सबा ही एक ज्वेलरी डिझायनर आहे. शर्मिला यांनी त्यांच्या संपत्तीची संपूर्ण जबाबराद ही लेक सबाला दिली आहे. 

लेक सबाला दिली संपत्तीची जबाबदारी

रिपोर्ट्सनुसार, शर्मिला टागोर यांनी लग्नानंतर देखील त्यांच्या नावावर संपत्ती खरेदी केली होती आणि अजूनही त्या तसं करतात. शर्मिला या एकूण 5 हजार कोटींच्या संपत्तीच्या मालकीण आहेत. पण त्यांनी पतौडी हाउसच्या भोपालमध्ये दुसरी 2700 कोटींच्या संपत्तीची जबाबदारी ही लेक सबाला दिली आहे. त्यात मज्जिद आणि दरगाह पासून सरकारी ऑफिसच्या जमीनी आणि अनेक पॅलेस सहभागी आहेत. दरम्यान, त्यांचा पतौडी पॅलेस हा अनेक चित्रपटांमध्ये आपण पाहतो. शर्मिला या हा पॅलेस शूटिंगसाठी भाड्यावर देतात आणि त्यातून पैसे कमावतात.