सलमान खानही 'गदर' करण्यासाठी सज्ज! 'टायगर 3'चं पोस्टर रिलीज

Tiger 3 Poster Release: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे 'टायगर 3' या चित्रपटाची. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे. हा चित्रपट दिवाळीत प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे सोशल मीडियावर या चित्रपटाचे पोस्टर हे चांगलेच व्हायरल झाले आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Sep 2, 2023, 04:16 PM IST
सलमान खानही 'गदर' करण्यासाठी सज्ज! 'टायगर 3'चं पोस्टर रिलीज  title=
tiger 3 poster released netizens reacts on it latest entertainment news

Tiger 3 : सध्या चर्चा आहे ती म्हणजे शाहरूख खानच्या 'जवान' या चित्रपटाची. त्याच्या या चित्रपटानं सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार या चित्रपटानं चांगला गल्ला देखील भरला आहे. अॅडव्हास बुकींगमध्ये सध्या हा चित्रपट टॉपवर आहे. त्यामुळे हा चित्रपट पहिल्या आठवड्यातच विक्रमी कमाई करणार असा अंदाज बांधला जातो आहे. त्यामुळे या चित्रपटाची सोशल मीडियावरही चर्चा आहे. त्याचसोबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे ती म्हणजे टायगर 3 या चित्रपटाची.

सलमान खान आणि कतरिना कैफच्या बहुचर्चित टायगर 3 या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. या दिवाळी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे या चित्रपटाची प्रेक्षकांची शिगेला गेलेली उत्सुकता ही आता संपली आहे. यावेळी कतरिनाचा आणि सलमानचा हा हटके लुक पाहून त्याचे चाहतेही त्याच्या प्रेमात पडले आहेत. टागयर 3 मधून प्रेक्षकांना काय नवीन पाहायला मिळणार याचीही प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. परंतु आता या पोस्टरनंही उत्सुकता अजूनच वाढवली आहे. 

गेल्या काही दिवसांपासून आता बॉलिवूडमध्ये सुगीचे दिवस येऊ लागले आहेत. मध्यंतरी दाक्षिणात्त्य चित्रपट हे जोरदार चालत असताना बॉलिवूडची मात्र उतरती कळा पाहायला मिळाली होती. त्यामुळे बॉलिवूडचे चित्रपट हे बॉक्स ऑफिसवर चांगलेच आदळत होते. त्यातून 2021-22 मध्ये बॉलिवूड चित्रपटांसाठी मात्र फार काही खास दिवस पाहायला मिळाले नव्हते. लाल सिंग चड्ढा असो, अक्षय कुमारचेही बरेच चित्रपट असोत हे चित्रपट हे एकामागून एक फ्लॉप होऊ लागले होते. त्यामुळे या चित्रपटांची फारशी चर्चाही झाली नव्हती. परंतु हे वर्षे बॉलिवूडसाठी फार चांगले आहे असे दिसते आहे कारण यावर्षीपासून हिंदी चित्रपट हे चांगल्याच प्रमाणात बॉक्स ऑफिसवर कामगिरी करताना दिसत आहेत. 

हेही वाचा : SRK नं Triple रोल करुनही 'हा' चित्रपट आपटला! आता डबल रोल असलेल्या 'जवान'चं काय होणार?

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

यावेळी सलमान खान आणि कतरिना कैफनं सोशल मीडियावरून आपल्या या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केले आहे. यावेळी त्या दोघांचाही डॅशिंग अंदाज पाहायला मिळतो आहे. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. त्यातून यावेळी त्या दोघांच्या हटके अंदाजानं त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. या पोस्टरमध्ये आकाशात फाईटर प्लेन उडताना दिसत आहेत. त्यातून यात त्या दोघांच्याही हातात बंदुका आहेत. सोबतच त्यांच्या चेहऱ्यावर या नानाविध जखमाही दिसत आहेत. हा चित्रपट दिवाळी प्रदर्शित होतो आहे.