टायगर-दिशाने विवाह बंधनात अडकावे, जॅकी श्रॉफची इच्छा

अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री दिशा पटानी या दोघांनी लग्न करण्याची इच्छा वडील जॅकी श्रॉफने व्यक्त केली.

Updated: Mar 13, 2019, 11:15 AM IST
टायगर-दिशाने विवाह बंधनात अडकावे, जॅकी श्रॉफची इच्छा  title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. लग्नाच्या या यादीत अभिनेता रणबीर कपूर अभिनेत्री आलिया भट्ट हे कपल आघाडीवर आहे. तर काही दिवसांपूर्वी अभिनेता वरूण धवण आणि त्याची गर्लफ्रेंड यावर्षी डिसेंबर महिन्यात विवीहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना उधाण आले. आता अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री दिशा पटानी या दोघांनी लग्न करण्याची इच्छा वडील जॅकी श्रॉफने व्यक्त केली. एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत जॅकी श्रॉफला टायगरच्या लग्ना संबंधित प्रश्न विचारण्यात आला. 

टायगर २५ वर्षांच्या असताना त्याच्या आयुष्यात एक खास व्यक्ति आली आणि आता ते दोघे फार चांगले मित्र-मैत्रिण असल्याचे जॅकी श्रॉफ यांनी सांगितले. त्याचबरोबर त्यांच्या आवडीही सारख्या आहेत. दोघांची विशेष आवड नृत्य, फिटनेस यांमध्ये आहे. दोघेही त्यांच्या कामाला अधिक प्राधान्य देत आसतात. त्यानंतर ते म्हणाले दिशाची कौटुंबिक पार्श्वभूमी लष्करी असल्यामुळे तीला माहित आहे अनुशासन किती महत्वाचे आहे. आता प्रतिक्षा आहे ती म्हणजे टायगर-दिशा यांच्या मैत्रीवर रूपांतर नात्यात कधी होईल.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Truly grateful for all the love. #Baaghi2 DishaPatani #SajidNadiadwala khan_ahmedasas foxstarhindi NadiadwalaGrandson TSeries.official

A post shared by Tiger Shroff (@tigerjackieshroff) on

 

अभिनेता जॅकी श्रॉफ बॉलिवूडच्या हिट हीरोंपैकी एक आहे. एक काळ गाजवलेल्या या अभिनेत्याच्या मुलाने मात्र बॉलिवूडमधे एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. चॉकलेट बॉय ते एक्शन स्टारच्या चाहत्यांची संख्या वाढत आहे. टायगर त्याच्या खाजगी आयुष्या बद्दलही तो तितकाच चर्चेत असतो. सध्या तो अभिनेत्री दिशा पटानीला डेट करत आहे.