VIDEO : 'या' स्टार किडची एन्ट्री होताच; पापाराझींनी केलं रणबीर कपूरकडे दुर्लक्ष

Starkid steals limelight of Ranbir Kapoor : ​रणबीर कपूरकडे दुर्लक्ष तर 'या' स्टारकिड्न वेधलं पापाराझींचं लक्ष, व्हिडीओ ठरतोय चर्चेचा विषय

दिक्षा पाटील | Updated: Nov 25, 2023, 06:05 PM IST
VIDEO : 'या' स्टार किडची एन्ट्री होताच; पापाराझींनी केलं रणबीर कपूरकडे दुर्लक्ष title=
(Photo Credit : Yogen Shah/ Bobby Deol Instagram)

Starkid steals limelight of Ranbir Kapoor : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या 'अ‍ॅनिमल' या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याच्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्यासाठी रणबीर अनेक कार्यक्रमांमध्ये हजेरी लावताना दिसतोय. त्यातही आता नुकत्याच एका कार्यक्रमात रणबीरला सोडून पापाराझींनी चक्क एका स्टार किडला पसंती दिली. रणबीर एका कोपऱ्यात बसला होता तर मध्येच जेव्हा रणबीरला हे जाणवलं तेव्हा तो उठून त्या स्टारकिडच्या फोटोत आला. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याचीच चर्चा सुरु आहे. चला तर जाणून घेऊया कोण आहे तो स्टारकिड.

बॉबी देओलच्या मुलानं वेधलं लक्ष

रणबीरसोबत या कार्यक्रमात बॉबी देओलनं देखील हजेरी लावली होतीय. यावेळी बॉबी देओलचा मुलगा आर्यमन देखील या कार्यक्रमात दिसला होता. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रणबीर कपूर असताना देखील बॉबी देओलच्या मुलानं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. त्याचा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केला आहे. आर्यमन यानं वडील बॉबी देओल, रणबीर कपूर आणि संदीप रेड्डी वांगा यांचा आगामी चित्रपट 'अ‍ॅनिमल' च्या म्यूजिक लॉन्च इव्हेंटमध्ये हजेरी लावली होती. या कार्यक्रमात आर्यमनला पाहताच पापाराझींनी त्याचे फोटो काढण्यास सुरुवात केली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

त्या व्हायरल झालेल्या व्हिडीओत बॉबी देओल आणि आर्यमन पापाराझींसाठी पोज देत आहेत. त्यावेळी बॉबी देओल आर्यमनला कोणत्या कॅमेऱ्याकडे कधी पाहायचे कसे पाहायचे हे सांगताना दिसतोय. तर दुसरीकडे रणबीर हा मागे बसलेला असून तो मध्येच व्हिडीओत येतो आणि काहीतरी बोलताना दिसतो. त्यातच आर्यमनला रणबीर हात लावून उभं राहण्यास सांगताना दिसतो. त्यानंतर आर्यमन आणि बॉबी उभे राहुन पापाराझींना पोज देताना दिसतात. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

'अ‍ॅनिमल' या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर या चित्रपटाचे दिग्दर्शन हे संदीप रेड्डी वांगा यांनी केले आहे. तर रणबीर कपूर या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहे. त्याच्यासोबत या चित्रपटात रश्मिका मंदाना दिसत आहे. तर या दोघांशिवाय अनिल कपूर देखील या चित्रपटात महत्त्वाची म्हणजेच रणबीरच्या वडिलांच्या भूमिकेत आहेत. दुसरीकडे बॉबी देओल या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत आहे. 

हेही वाचा : असं कोणी कधी करतं का? सनी देओलनं केलेली एक चूक बॉबीला चांगलीच महागात पडली; हाड मोडलं अन्...

बॉबी देओलनं 1996 मध्ये तान्याशी लग्न केलं. त्या दोघांना दोन मुलं असून आर्यमन देओल आणि धरम देओल अशी त्यांची नावं आहेत.