सारा- कार्तिकच्या नात्याविषयी अखेर सैफ म्हणाला...

येत्या काळात सारा आणि कार्तिक.... 

Updated: Oct 17, 2019, 07:52 PM IST
सारा- कार्तिकच्या नात्याविषयी अखेर सैफ म्हणाला... title=

मुंबई : गेल्या काही वर्षांपासून हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये नवोदित कलाकाकारांचा बराच वावर पाहायला मिळत आहे. यापैकीचत एक नाव म्हणजे सैफ अली खान, अर्थात बी- टाऊनच्या नवाबाची लेक सारा अली खान. 'केदारनाथ' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या साराचं नाव कार्तिक आर्यन याच्याशी जोडलं जात आहे. 

एका कार्यक्रमात कार्तिक आपलं क्रश असल्याचं सारा म्हणाली होती, पुढे कार्तिक आणि साराची ओळख झाली. त्यांच्यात मैत्रीही झाली. पाहता पाहता कार्तिक आणि साराचं मैत्रीचं हे नातं खऱ्या अर्थाने बी- टाऊनमध्ये चर्चेचा विषय ठरलं. 

आगामी चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र वेळ व्यतीत करणं असो, एकमेकांच्या वाढदिवसानिमित्त खास बेत आखणं असो. सारा आणि कार्तिक कायमच सर्वांचं लक्ष वेधत असतात. मुळात त्यांचं हे नातं मैत्रीपलीकडचं असल्याचं म्हणज ही जोडी रिलेशनशिपमध्ये असल्याचंही म्हटलं जात आहे.

कारकिर्दीच्या सुरुवातीला आपल्या मुलीसोबत कार्तिकचं नाव जोडलं जाण्याविषयी आता अभिनेता सैफ अली खान याने त्याची प्रतिक्रिया दिली आहे. 'एक व्यक्ती म्हणून सारा फार चांगली आहे. तिला नेमकं काय हवं आहे याची जाण आहे. मुळात तिला चांगल्याची पारख आहे. मला खात्री आहे की तो (कार्तिक) फार चांगला असेल. कारण मला साराच्या प्रत्येक संस्कारावर, निर्णयावर मला पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे जर साराला कार्तिक आवडत असेल तर, तो नक्कीच चांगला असेल यात शंका नाही', असं सैफ ई- टाईम्सशी संवाद साधताना म्हणाला. 

येत्या काळात सारा आणि कार्तिक हे इम्तियाज अली दिग्दर्शित चित्रपटातून झळकणार आहेत. 'लव आज कल' या चित्रपटाच्या सिक्वलमधून याच चित्रपटाच्या सेटवर त्यांच्यातील नातं अधिक बहरलं. तेव्हा आता ऑफस्क्रीन केमिस्ट्रीमुळे चर्चेत असणाऱ्या या जोडीची ऑफस्क्रीन केमिस्ट्री गाजते का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.