फक्त ५ वी शिकली आहे ही बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री

...म्हणून फक्त ५ वी शिकली ही अभिनेत्री

Updated: Apr 15, 2018, 06:22 PM IST
फक्त ५ वी शिकली आहे ही बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री title=

मुंबई : बॉलीवूडचे अनेक कलाकार उच्च शिक्षित आहेत. बॉलीवूडमध्ये करिअर करत असतांना अनेक कलाकारांनी आपलं शिक्षण देखील पूर्ण केलं. बॉलीवूडमध्ये असे अनेक कलाकारा आहेत ज्यांनी कमी शिक्षण असताना देखील मोठं यश मिळवलं आहे. यातच एक बॉलिवूड अभिनेत्री अशी आहे जी फक्त ५ वी शिकली आहे पण बॉलीवूडमध्ये आपल्या अॅक्टींगने अनेकांच्या मनावर राज्य करते आहे. कपूर कुटुंबियांमध्ये ही सर्वात कमी शिकलेली अभिनेत्री आहे. 

पाहा का शिकली नाही पुढे

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा कपूर ही फक्त ५ वी पर्यंत शिकली आहे. संपूर्ण कपूर कुटुंबिय अनेक दशकांपासून बॉलीवूडमध्ये आहे. कपूर कुटुंबातील अनेक जणं हे १० ते १२ पर्यंतच शिकलेले आहेत. त्यात करिश्मा फक्त ५ वी पर्यंत शिकली आहे. यामागे देखील एक कारण आहे. करिश्मा कपूरचा कैदी हा पहिला सिनेमा होता. शूटिंगदरम्यान ती ६ वी मध्ये शिकत होती. त्यावेळेस तिने अभिनयामध्ये करिअर करण्यासाठी भर दिला आणि शिक्षणाकड़े दुर्लक्ष केलं. त्यामुळे ती फक्त ५ वी पर्यंत शिकली.