या प्रसिद्ध ब्युटी क्वीनला अमेरिकामध्ये जाण्याची बंदी

तिच्या सौंदर्यासाठी अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. 

Updated: Jan 10, 2022, 08:30 PM IST
या प्रसिद्ध ब्युटी क्वीनला अमेरिकामध्ये जाण्याची बंदी title=

मुंबई : ब्रिटनची ब्युटी क्वीन लीन क्लाइव्हच्या सौंदर्याची जगभरात चर्चा होत आहे. तिला तिच्या सौंदर्यासाठी अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. पण तिला अमेरिकेत जाण्याची परवानगी नाही. आता तुम्ही विचार करत असाल की, या सुंदर मॉडेलला अमेरिकेत एंट्री का मिळत नाहीये. चला तर मग आम्ही तुम्हाला आज या मागचं कारण सांगणार आहोत.

मॉडेलला का मिळत नाहीये अमेरिकेत एंट्री?
ग्लोबल ब्यूटी कांटेस्ट 'मिसेस वर्ल्ड कॉम्पिटिशन' अमेरिकेत होणार आहे. त्यात सहभागी होण्यासाठी लीन क्लाइव्हला अद्याप अमेरिकेत जाण्याची परवानगी मिळालेली नाही. स्वतः लीन क्लाइव्हने अमेरिकेत प्रवेश करताना येणाऱ्या अडचणीं बद्दल माहिती दिली आहे. क्लाइव्हने सांगितलं की, तिचा जन्म सीरियामध्ये झाला, त्यामुळेच तिला अमेरिकेत जाण्यासाठी व्हिसा मिळालेला नाही.

अमेरिकाने दिला नाही व्हिसा 
29 वर्षीय लीन क्लाइव्ह ही जगप्रसिद्ध मॉडेल आहे. 15 जानेवारी रोजी अमेरिकेतील लास वेगास ईथे होणाऱ्या 'मिसेस वर्ल्ड' स्पर्धेत क्लाईव्ह ब्रिटनचं प्रतिनिधीत्व करणार आहे. अशा परिस्थितीत त्यांना व्हिसा न मिळणं हा तिच्यासाठी तसंच ब्रिटनसाठी मोठा धक्का आहे. या स्पर्धेत क्लाईव्हशिवाय इतर देशांतील ५७ महिलाही सहभागी होणार आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पती आणि मुलीला मिळाला व्हिसा 
बीबीसीच्या रिपोर्टनुसार, क्लाइव्ह म्हणाली की, तिच्या पती आणि मुलीला लास वेगासला जाण्यासाठी व्हिसा मिळाला होता. पण तिला व्हिसा नाकारण्यात आला. सीरियातील दमास्कस येथे जन्मल्यामुळे तिला व्हिसा देण्यात येणार नाही, असा क्लाइव्हचा आरोप आहे. या मुद्द्यावर अमेरिकन अधिकार्‍यांना विचारलं असता त्यांनी कोणतेही उत्तर दिलेलं नाही.