Actress was replaced by Dog : सध्या फोटोत दिसणारी ही चिमुकली कोण असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तुमच्या माहितीसाठी ही अभिनेत्री दुसरीकोणी नसून बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करणारी अभिनेत्री आहे. पण तिनं तिच्या करिअरच्या सुरुवातीला खूप स्ट्रगल केलं. तिला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. त्याचा खुलासा तिनं स्वत: केला आहे. या अभिनेत्रीनं हा देखील खुलासा केला की तिला चित्रपटातून कसं आणि कोणी रिप्लेस केलं. तिला कोणत्या अभिनेत्रीनं रिप्लेस केलं नाही तर एका श्वानानं रिप्लेस केलं होतं. ती अभिनेत्री सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. या अभिनेत्रीनं लीड म्हणून कोणाता हिट किंवा ब्लॉकबस्टर चित्रपट दिला नाही. पण तिनं अनेक गाजलेल्या आणि ब्लॉकबस्टर ठरलेल्या चित्रपटांमध्ये सपोर्टिंग रोलची भूमिका साकारली. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की ही अभिनेत्री आहे तरी कोण? चला तर तिच्याविषयी जाणून घेऊया.
ही अभिनेत्री दुसरी कोणी नसुन अक्किनेनी कुटुंबाची सून शोभिता धूलिपाला आहे. शोभिता धूलिपालाचा जन्म हा आंध्र प्रदेशच्या गुंटूर जिल्ह्यातील तेनालीमध्ये झाला होता. ती एक मिडल क्लास कुटुंबाचा एक भाग आहे. तिचे वडील हे मर्चेंट नेव्हीमध्ये इंजीनियर आहेत आणि आई शिक्षिका. शोभितानं तिचं शिक्षण हे विशाखापट्टनम येथून केलं आहे. सगळ्यात आधी तिनं कॉर्पोरेट लॉचं शिक्षण केलं आणि मग तिनं मुंबई यूनिव्हर्सिटीमधून HR बिझनेस आणि इकॉनॉमिक्समध्ये ड्रिगी घेतली.
काही वर्षांपूर्वी शोभिताचं संपूर्ण कुटुंब हैदराबादमध्ये शिफ्ट झालं. अभ्यासासोबत शोभितानं भरतनाट्यम आणि कुचिपुडी शिकली होती. 2010 मध्ये नेवी बॉल स्पर्धेत सहभागी झाली आणि तिनं नेवी क्वीनचा खिताब पटकावला. त्यानंतर तिला मॉडेलिंगमध्ये करियर करण्याची इच्छा झाली.
हेही वाचा : 'पुष्पा 2: द रुल' मधील हा एकच सीन कमावून देणार 2000 कोटी, VIDEO VIRAL
करिअरच्या सुरुवातीला शोभिताला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. एक ऑडिशन देत असताना तिला सांगण्यात आलं की कॅमेरा खराब झाला आहे तर उद्या ये. पण त्यानंतर त्यांनी सांगितलं की तो त्या भूमिकेसाठी फिट नाही आणि तिच्या जागी श्वानाला घेतलंय. शोभितानं सांगितलं की त्यानंतर तेच लोक तिला एका जाहिरातीसाठी विचारत होते आणि त्यांनी ऐश्वर्या रायसोबत या जाहिरातीत काम केलं. पण तिनं हे सांगितलं की तिच्या जागी श्वानाला घेणं हे अपमानास्पद होतं.