Popular Actress did 29 Surgery To Look Young : बॉलिवूड अभिनेत्री या त्यांच्या सुंदरतेसोबत त्यांच्या फिटनेसकडे देखील लक्ष देतात. त्यांना त्यांच्या चेहऱ्यावर असणारं तेच हे टिकवून ठेवायचं असतं. जेणे करून त्यांचं जास्त वय हे दिसणार नाही. बॉलिवूडमधील अशीच एक सुंदर अभिनेत्री आहे ज्या अभिनेत्रीनं सुंदर दिसण्यासाठी तब्बल 29 सर्जरी केल्या होत्या. इतकंच नाही तर जेव्हा त्या अभिनेत्रीचं निधन झालं त्याच्या आधी देखील त्यांनी एक सर्जरी केल्याचे म्हटले जाते. सध्या तिच्या सर्जरीच्या आधीचे फोटो व्हायरल झाले आहे. यातील त्या अभिनेत्रीचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे फोटो पाहून तुम्ही तिला ओळखू शकणार नाही.
जर तुम्ही अजूनही ओळखू शकत नसाल तर चला आज त्याच अभिनेत्रीविषयी जाणून घेऊया की कोण आहे ही अभिनेत्री. ही अभिनेत्री दुसरी कोणी नाही तर श्रीदेवी आहे. असं म्हटलं जातं की श्रीदेवी यांनी अनेक सर्जरी केल्या होत्या. दरम्यान, श्रीदेवी यांचा एक थ्रोबॅक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात त्यांना ओळखणं खूप कठीण आहे. तर चाहते देखील या फोटोवर कमेंट करत आहेत. श्रीदेवी यांच्या व्हायरल होत असलेल्या फोटोवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, तरुणपणातील श्रीदेवी. दुसरा नेटकरी म्हणाला, ओळखणं कठीण होतंय.
दरम्यान, श्रीदेवी या त्यांच्या दिसण्याला घेऊन खूप कॉन्शियस राहते. त्यांची इच्छा होती की त्यांनी कायम तरुण दिसावं त्यामुळे त्या सर्जरी करायच्या. रिपोर्ट्सनुसार, त्यांनी 29 सर्जरी केल्या होत्या. त्यांनी स्किन सर्जरी, सिलिकॉन ब्रेस्ट करेक्शन, बोटॉक्स, बॉडी टकिंग, फेस लिफ्ट अप्स सारख्या सर्जरी केल्याचे म्हटले जाते.
हेही वाचा : 'प्रभास जोकरच, अरशद वरसी खरं बोलला होता!' OTT वर Kalki 2898 AD पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
श्रीदेवी यांनी निधनाच्या काही दिवसांआधी लिप्स सर्जरी केली होती. त्यामुळे त्यांच्या ओठांचा आकार हा थोडा बिघडला होता. सर्जरी बिघडल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना औषधांचे हाय डोस दिले होते. श्रीदेवी यांनी 24 फेब्रुवारी 2018 मध्ये जगाचा निरोप घेतला. आजही त्यांचं कुटुंब हे त्यांच्या निधनाच्या बातमीतून बाहेर आलेलं नाही. त्यांच्या दोन्ही मुली जन्म दिवशी आणि त्यांच्या डेथ अॅनिव्हर्सलीला आईची आठवण काढत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना दिसतात. जान्हवी तर तिच्या आईसाठी प्रार्थना करण्यासाठी तिरुपती बालाजीला देखील जाते.
अफगाणिस्तानमध्ये श्रीदेवी आणि अमिताभ बच्चन 1992 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'खुदा गवाह' या चित्रपटाचं शूटिंग करत होते त्यावेळी श्रीदेवी यांचा एक चाहता तिथे आला होता. हा चाहता कोणी दुसरा नाही तर तालिबान सरदाह होता. तर श्रीदेवी यांच्या सुरक्षेसाठी देशाची अर्धी एअरफोर्स तैनात केली होती.