'तारक मेहता' च्या भूमिकेत दिसणार 'हा' दिग्गज अभिनेता, चाहत्यांसाठी सुखद धक्का

पाहा कोण आहे हा अभिनेता...

Updated: Sep 12, 2022, 04:09 PM IST
'तारक मेहता' च्या भूमिकेत दिसणार 'हा' दिग्गज अभिनेता, चाहत्यांसाठी सुखद धक्का title=

मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. ही मालिका गेल्या 14 वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकारानं प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अलीकडेच तारक मेहताची भूमिका साकारणारा अभिनेता शैलेश लोढानं मालिकेतून काढता पाय घेतला आहे. तेव्हापासून निर्माते नवीन तारक मेहताच्या शोधात होते. आता त्यांचा शोध संपला असून नवीन तारक मेहता भेटला आहे.

आणखी वाचा : पाकिस्तानच्या अपयशानंतर काकूंचा राग अनावर ..., Viral Video पाहून तुम्हीही म्हणाल... 

'तारक मेहता...' ही मालिका काही दिवसांपूर्वी शैलेश लोढानं शो सोडला म्हणून चर्चेत आली आहे. शैलेश लोढानं शो सोडल्यानंतर अनेक कलाकारांनी मालिका सोडली. त्यानंतर चाहत्यांनी तारक मेहताला परत आणा अशी मागणी देखील केली. आता चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. तारक मेहता हे पात्र आता आपल्याला पुन्हा एकदा मालिकेत पाहायला मिळणार आहे. 'ईटाइम्स'नं दिलेल्या माहितीनुसार, तारक मेहताची भूमिका आता शैलेश लोढा नाही तर सचिन श्रॉफ साकारणार आहे. 

आणखी वाचा : 'सेक्स, सेक्स आणि...', अनिल कपूर यांनी तरुण दिसण्याचं सिक्रेट केलं शेअर

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आणखी वाचा : समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नातं काय? शरद पोंक्षे यांचा Video Viral 
मीडिया रिपोर्ट्सनुसार सचिन श्रॉफ 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये शैलेश लोढा यांची जागा घेऊ शकतो. इतकंच नाही तर या अभिनेत्यानं दोन दिवस शूटिंगही केल्याची बातमी आहे. मात्र, अद्याप याप्रकरणी सचिन श्रॉफ किंवा निर्मात्यांनी दुजोरा दिलेला नाही. सचिन श्रॉफनं अनेक लोकप्रिय टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे. सचिन श्रॉफ सगळ्यात शेवटी ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या 'आश्रम' आणि टीव्ही शो 'गम है किसी के प्यार में' मध्ये दिसला होता. 

Bas Bai Bas : 'मी हार्ट ब्रोकन झाले...', सई ताम्हणकरचं वक्तव्य चर्चेत

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शैलेश लोढा हे त्यांच्या करारानं खूश नव्हता, त्याला वाटू लागले की त्यांचा वेळ आणि तारखा या योग्य प्रकारे वापरल्या जात नाही. शैलेशनं शो सोडण्यामागील एक प्रमुख कारण म्हणजे त्याला दुसऱ्या भूमिका करता येत नव्हत्या. गेल्या वर्षी त्यानं अनेक मोठ्या मोठ्या ऑफर्स नाकारल्या होत्या.