17 वर्ष 'या' अभिनेत्याला माधुरी दीक्षितला घेऊन जायचं आहे त्याच्या बेडरूममध्ये

माधुरी दीक्षितला आज कोणत्याही विशेष परिचयाची गरज नाही. 

Updated: Sep 18, 2022, 04:36 PM IST
17 वर्ष 'या' अभिनेत्याला माधुरी दीक्षितला घेऊन जायचं आहे त्याच्या बेडरूममध्ये  title=

मुंबई :  माधुरी दीक्षितला आज कोणत्याही विशेष परिचयाची गरज नाही. माधुरीने आपल्या काळात ऐका-पेक्षा एक जबरदस्त सिनेमे दिले आहेत. माधूरीने प्रत्येक सिनेमातील तिच्या अभिनयाने चाहत्यांना वेड लावलं. 'अबोध' या सिनेमातून माधूरीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. तिच्या उत्कृष्ट अभिनयामुळेच माधुरी बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींच्या यादीत येते. माधुरीच्या सौंदर्याचे सर्वांनाच वेड लागलं आहे. पण आज आम्ही तुम्हाला माधुरी दीक्षितशी संबंधित असा एक किस्सा सांगणार आहोत, जो ऐकून तुमचाही विश्वास बसणार नाही.

या 17 वर्षीय अभिनेत्याला माधुरी दीक्षितला घेऊन जायचे होतं त्याच्या बेडरूममध्ये...
सुंदर माधुरी दीक्षितचे भारतातच नाही तर देशात आणि जगात अनेक फॅन्स आहेत. परंतु आज आम्ही तुम्हाला अशाच एका बॉलिवूड अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत ज्याबद्दल जाणून घेतल्यावर तुमचा विश्वास बसणार नाही.

माधुरी दीक्षितला त्याच्या बेडरूममध्ये घेऊन जाण्याचा इरादा दुसऱ्या तिसऱ्या कोणाचा नसून सिद्धार्थ मल्होत्राचा ​​होता. होय, माधुरी दीक्षितपेक्षा 17 वर्षांनी लहान असलेल्या सिद्धार्थ मल्होत्राने लाइव्ह शोमध्ये हे सांगितले होतं. सिद्धार्थच्या तोंडून बाहेर पडलेली ही भन्नाट गोष्ट ऐकून सगळेच हैराण झाले.

खरं तर हे सगळं प्रकरण करण जोहरच्या कॉफी विथ करण या शोमध्ये घडलं आहे. या शोच्या एका एपिसोडमध्ये सिद्धार्थ, आलिया आणि वरुण उपस्थित होते. अशा परिस्थितीत, रॅपिड फायर राउंड दरम्यान, जेव्हा करणने सिद्धार्थला विचारले की त्याला कोणत्या बॉलिवूड अभिनेत्रीला त्याच्या बेडरूममध्ये घेऊन जायचं आहे, तेव्हा त्याने काहीही विचार न करता माधुरी दीक्षितचं नाव घेतलं. सिद्धार्थचे हे उत्तर ऐकून सर्वांचीच तोंड उघडी राहिली. मात्र, सिद्धार्थने सांगितलं की, हे त्याचे माधुरी दीक्षितवरील प्रेम आहे, दुसरं काही नाही.

हे उत्तर ऐकल्यानंतर माधुरी दीक्षितची प्रतिक्रिया अशी होती
याच शोच्या एका एपिसोडमध्ये माधुरी दीक्षित आणि जुही चावला देखील दिसल्या होत्या. अशा परिस्थितीत जेव्हा करण जोहरने तिला हा व्हिडिओ दाखवला ज्यामध्ये सिद्धार्थ म्हणाला, ''ती खूप चांगली डान्सर आहे, तेव्हा तिच्या एक्सप्रेशन माझ्या मनात घर करुन राहतात. हीच मुलगी मला बेडरूममध्ये घेऊन जायची आहे." सिद्धार्थचे म्हणणं ऐकून घेतल्यानंतर माधुरी दीक्षित म्हणाली, मला आश्चर्य वाटतंय. सिद्धार्थने खरंच असं म्हटलं आहे का?