मुंबई : अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या अनेक वर्षांपासून अभिनयापासून दूर आहे. सुष्मिता आता रूपरी पडद्यावर झळकत नसली तरी ती खसगी जीवनामुळे कायम चर्चेत असते. एवढंच नाही तर सुष्मिता चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर कायम फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते. सुष्मिता सोशल मीडियावर दोन मुली आणि बॉयफ्रेन्ड रोहमन शॉलसोबत फोटो शेअर करत असते. शिवाय ती तिच्या फिटनेस व्हिडिओंमुळे देखील चर्चेत असते.
रोहमन आणि सुष्मितामधील असलेलं नातं प्रत्येकाला ठावूक आहे. दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट करण्यात येतं. शिवाय दोघेही व्यस्तवेळापत्रकातून वेळ काढत एकत्र वेळ व्यतीत करत असतात. आता पुन्हा दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. पण झालं असं की फोटो व्हायरल होताचं सुष्मिताला ट्रोल करण्यात आलं आहे.
दरम्यान, सुष्मिता आणि रोहमन आउटींगसाठी गेले होते. तेव्हा रोहमनने सुष्मिताची हँडबॅग पकडली होती. पण ही गोष्ट युझर्सला काही पटली नाही. रोहमन आणि सुष्मिताचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यानंतर एक युझरने कमेन्टमध्ये लिहिलं की, 'यांना फक्त त्यांच्या बॅग उचलण्यासाठी पुरूषांची गरज असते. त्यांना एका व्यक्तीची गरज नसते.'
तर दुसऱ्या युझरने लिहिलं की, 'ती स्वतःची बॅग स्वतः नाही उचलू शकत नाही का?' सुष्मिता आणि रोहमनचा हा फोटो अनेकांना खटकला तर काहींनी मात्र फोटोचं कौतुक केलं.