सोशल मीडियावर व्हायरल मीम्सचा 'कलंक'

नेटकऱ्यांनी अफलातून मीम्स साकारले आहेत. 

Updated: Apr 4, 2019, 11:35 AM IST
सोशल मीडियावर व्हायरल मीम्सचा 'कलंक' title=

मुंबई : आलिया भट्ट, वरुण धवन, आदित्य रॉय कपूर, सोनाक्षी सिन्हा, माधुरी दीक्षित आणि संजय दत्त यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या 'कलंक' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. भव्य सेट, संवाद आणि कलाकारांचा अभिनय या बळावर 'कलंक'च्या ट्रेलरला प्रेक्षकांचीही पसंती मिळाली. मुख्य म्हणजे कलाविश्वातील इतर सेलिब्रिटींनीही या ट्रेलरची प्रशंसा केली. 

प्रेम आणि नात्यांकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टीकोन या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहता येणार आहे. त्याचीच एक झलक ट्रेलरमधूनही पाहायला मिळत आहे. 'कलंक'च्या याच ट्रेलरमधील काही संवाद हेरत नेटकऱ्यांनी अफलातून मीम्स साकारले आहेत. काही दैनंदिन प्रसंगांचा संदर्भ देत या गंभीर संवादांना मोठ्या विनोदी अंगाने सोशल मीडियावर पोस्ट करत हा 'कलंक' व्हायरल केला आहे. 

हे आहेत काही धमाल मीम्स.... 

करण जोहरची निर्मिती असणाऱ्या 'कलंक' या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिषेक वर्मनने केलं आहे. चित्रपटाची अवघ्या काही मिनिटांची झलक पाहता मोठे आणि तितकेच आकर्षक सेट, एक वेगळा काळच जणू प्रेक्षकांची वाट पाहत असल्याची अनुभूती होते. सध्याच्या घडीला ट्रेलरप्रमाणेच या चित्रपटातील काही गीतंही अनेकांच्याच पसंतीस उतरत आहेत. १७ एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, करण जोहरच्या या स्वप्नवत चित्रपटाता प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो आणि हा 'कलंक' बॉक्स ऑफिसवर कितपत यशस्वी ठरतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.