Bollywood Actresses : बॉलिवूड अभिनेत्रींनी त्यांच्या अभिनयाने स्वत:ची वेगळीच ओळख निर्माण केली आहे. त्यांनी त्यांच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. प्रत्येक अभिनेत्रीने नेहमीच मोठ्या पडद्यावर स्वत:च्या कलेला सिद्ध केले आहे. या अभिनेत्रींनी आपल्या खास व्यक्तिरेखेने प्रेक्षकांच्या हृदयावर आणि मनावर अशी छाप सोडली की प्रेक्षकही त्यांना त्याच व्यक्तिरेखेवरून ओळखू लागले, पण अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांनी चांगली प्रसिद्धी आणि ओळख मिळवण्यासाठी त्यांचे नाव देखील बदलले आहे. आज आम्ही तुम्हाला बॉलीवूडच्या त्या मुस्लिम अभिनेत्रींबद्दल सांगत आहोत ज्यांनी हिंदू नावं ठेवून प्रसिद्धी मिळवली. (These famous Bollywood actresses were born in Muslim families but rose to fame with Hindu names nz)
पन्नास-साठच्या दशकात आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री मधुबालाचे खरे नाव मुमताज बेगम होते. तिने बॉलिवूडमध्ये प्रवेश करताच तिचे नाव बदलून मधुबाला ठेवले. मधुबालाला खरी ओळख 1947 साली आलेल्या 'नीलकमल' चित्रपटातून मिळाली. मधुबाला उर्फ मुमताज बेगम या दिल्लीतील मुस्लिम कुटुंबातील होत्या.
बॉलिवूड चित्रपटांमध्ये अभिनेता जितेंद्रची नायिका म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री रीना रॉय देखील मुस्लिम कुटुंबातील आहे. रीना रॉयचे खरे नाव सायरा अली आहे. 1972 मध्ये 'जरूरत' चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवण्यासोबतच सायरा अलीने तिचे नाव बदलून रीना रॉय असे ठेवले.
बॉलिवूड इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध चेहरा असलेली तब्बू देखील मुस्लिम कुटुंबातील आहे. तिचे खरे नाव तबस्सुम फातिमा हाश्मी आहे. तब्बूने 1985 मध्ये 'हम नौजवान' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले.
चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री आलिया भट्टचे एक रहस्य तिच्या चाहत्यांनाही माहित नसेल. आलिया भट्ट नावाने हिंदू वाटत असली तरी ती मूळच्या मुस्लिम कुटुंबातील आहे. आलिया भट्टच्या आजोबांचे नाव शिरीन मोहम्मद अली होते.
संजय दत्तची (Sanjay Dutt) पत्नी मान्यता दत्तही मुस्लिम आहे. तिचे खरे नाव दिलनवाज शेख असून ती संजय दत्तची तिसरी पत्नी आहे. चित्रपटात दिसण्यासाठी मान्यताने तिचे नाव बदलून दिलनवाज शेख असे ठेवल्याचे सांगितले जाते. 'गंगाजल' चित्रपटात आयटम नंबर करून ती प्रसिद्धीच्या झोतात आली होती.