Priyanka Chopra ची दिग्गज अभिनेत्यांवर टीका, 'अभिनेते फुकटच...'

दिग्गज अभिनेत्यांबाबत इतका वाईट शब्द का वापरला प्रियंका चौप्राने?  

Updated: Nov 19, 2022, 07:28 PM IST
Priyanka Chopra ची दिग्गज अभिनेत्यांवर टीका, 'अभिनेते फुकटच...' title=
these big artists do nothing yet we give them so much credit why bollwood famous actress priyanka chopra said nz

Priyanka Chopra : प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) ही तिच्या नवनवीन प्रोजेक्टसमुळे नेहमीच चर्चेत असते. ही देसी गर्ल (Desi Girl) सध्या बॉलिवूडमध्ये फारशी सक्रिय नसली तरी ती तिच्या सोशल मीडियाला (Social Media) चांगलीच सक्रिय आहे. सध्या ती अनेक हॉलीवूड (Hollywood) चित्रपटांच्या शुटींगमध्ये (Shooting) व्यस्त आहे. सध्या प्रियांका चोप्रा तीन वर्षांनंतर भारतात परतली असून तिच्या हेअरकेअर उत्पादनांची रेंज लॉन्च (Hair Care Brand Launch) केली आहे. एका मुलाखतीदरम्यान, अभिनेत्रीने जगातील प्रसिद्ध लोकांसोबत काम करण्याचा तिचा अनुभव सांगितला. ती असंही म्हणाली की हे मोठे कलाकार "काहीही करत नाहीत" तरीही आम्ही त्यांना खूप श्रेय देतो. (these big artists do nothing yet we give them so much credit why bollwood famous actress priyanka chopra said nz)

अभिनेता काहीही करत नाही

प्रियांका चोप्रा आता तिच्या कुटुंबासह एलएमध्ये (Los Angeles) राहते. तिने जेनिस सिक्वेराशी संभाषणात दावा केला की दिग्दर्शकांसोबत (Director) काम केल्याने तिला सर्वोत्कृष्ट अभिनेता कसे व्हायचे हे शिकयला मिळाले. तिने खुलासा केला की, "मी बॉलीवूडमध्ये (Bollywood) काम करत असतानाही, सर्वोत्कृष्ट चित्रपट निर्मात्यांसोबत काम केल्याने मला सर्वोत्कृष्ट अभिनेता कसा असावा हे शिकायला मिळाले. आम्ही कलाकारांना खूप श्रेय देतो, तर कलाकार काहीच करत नाहीत. आम्ही खरोखर काहीही करत नाही. हे मी नेहमीच सांगितले आहे. अभिनेते काहीही करत नाहीत."

हे ही वाचा - 'या' प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रींनी सी-सेक्शनद्वारे बाळाला दिला जन्म, नावं वाचून व्हाल हैराण

इतर लोक सर्व कामे करतात

ती पुढे म्हणाली, "आम्ही दुसऱ्याचे शब्द म्हणतो, दुसऱ्याने लिहिलेल्या स्क्रिप्टवर (Script) आम्ही काम करत आहोत, आम्ही लिप-सिंक करत आहोत आणि दुसऱ्याच्या आवाजात असलेली गाणी गातो आहोत. आम्ही डान्स स्टेप्स करत आहोत जे दुसऱ्याने कोरिओग्राफ (Choreograph) केले आहेत. आम्ही मार्केटिंग (Marketing) करत आहोत जिथे कोणीतरी प्रश्न विचारतो. कोणी आपल्याला कपडे घालते, कोणी आपले केस करते, कोणी आपला मेकअप (Make-up) करते. मग आपण काय करतोय?"

 

30 सेकंदांत फक्त मी

आपले बोलणे पुढे चालू ठेवत ती म्हणाली की, अभिनेत्याची भूमिका ही केवळ अॅक्शन आणि कट यामधील असते. "ज्या दृश्यात मी उपस्थित असते त्या 30 सेकंदांत फक्त मी असते. आणि मग जेव्हा मी चित्रपट वगैरेबद्दल बोलते तेव्हा माझी भूमिका खूप मर्यादित असते."