OTT वर सहज पाहू शकता वादाच्या भोवऱ्यात सापडलेले 'हे' 12 चित्रपट अन् वेबसिरिज

OTT Web Series News: ओटीटीचं जग हे फारचं मोठं आहे त्यातून येथे अनेक प्रकारच्या आशयाचे खाद्य तुम्हाला मिळेल. सध्या अशाच काही वादग्रस्त वेबसिरिजबद्दल आपण बोलणार आहोत. ज्यांची सध्या जोरात आहे. आता तुम्ही हे चित्रपट आणि वेबसिरिज कधीही पाहू शकता. 

गायत्री हसबनीस | Updated: Nov 8, 2023, 02:28 PM IST
OTT वर सहज पाहू शकता वादाच्या भोवऱ्यात सापडलेले 'हे' 12 चित्रपट अन् वेबसिरिज title=
these are the ott webseries that are most controversial ever

OTT Web Series News : सध्या अनेकांना दिवाळी सुट्टी असेलच. त्यातून सर्वच जणं विविध प्रकारच्या वेबसिरिज पाहणं हे पसंत करतात. सध्याही तुम्ही अनेक प्रकारच्या वेबसिरिज पाहू शकतो. तुम्ही घरबसल्या दिवाळीची तयारी करून थकला असाल तर यावेळी घरबसल्या तुम्ही या टॉप 12 वेबसिरिज आणि चित्रपट हे पाहू शकता. हा या 12 वेबसिरिजची बरीच चर्चा होती कारण हे चित्रपट अत्यंत वादग्रस्त होते. ज्याच्या विषयांमुळे त्यांची जोरात चर्चा होती. त्यांच्या चित्रपटांच्या विषयांमुळे त्यांची बरीच चर्चा होती. चला तर नक्की जाणून घेऊया की या चित्रपटांचा नक्की वाद काय होता आणि यांचा नक्की विषय काय होता. 

द काश्मिर फाईल्स : 

त्यातील सर्वात पहिली वेबसिरिज होती ती म्हणजे द काश्मिर फाईल्स. या वेबसिरिजची बरीच चर्चा रंगलेली होती. काश्मिर पंडितांचे दारूण वास्तव या दाखवले होते. परंतु यावरून ही प्रोपोगेंडा फिल्म आहे अशी बरीच चर्चा रंगलेली होती. विवेक अग्निहोत्रींचीही बरीच चर्चा होती. हा चित्रपट आता ZEE5 वर प्रदर्शित झाला आहे. 

PK : 

गेल्या काही वर्षांत आमिर खान आणि वाद हे समीकरणच झालंय जणू. 2014 मध्ये जेव्हा त्याचा PK हा चित्रपट प्रदर्शित झाला होता तेव्हा त्याची प्रचंड चर्चा ही रंगलेली होती. परंतु यात देवांचा अपमान करण्यात आला आहे अशी जोरात चर्चा सुरू झाली. आमिर खानच्या भुमिकेवरही प्रचंड टीका झाली होती. PK हा चित्रपट 'नेटफ्लिक्स'वर उपलब्ध आहे. 

ब्लॅक फ्रायडे :

अनुराग कश्यपनं दिग्दर्शित केलेला ब्लॅक फ्रायडे हा चित्रपटही प्रचंड लोकप्रिय होता. परंतु त्याच्यावरही अनेक टीका झाली होती. 1993 च्या बॉम्बब्लास्टवर आधारित हा चित्रपट होता. सुरूवातीला हा चित्रपट बॅनही करण्यात आला होता. 'डिस्ने प्लस हॉटस्टार'वर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता. 

जोधा अकबर : 

जोधा अकबर हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय झाला होता. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित या चित्रपटाचीही भरपूर चर्चा होती. या चित्रपटावरूनही वाद निर्माण झाला होता. परंतु आता हा चित्रपट आता ओटीटीवर उपलब्ध आहे. जोधा अकबर हा चित्रपट आता 'नेटफ्लिक्स'वर आला आहे. 

ओह माय गॉड : 

यावर्षी ओह माय गॉड 2 हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ज्याची बरीच चर्चा तर होतीच. सोबतच या चित्रपटाच्या विषयावरून वादही सुरू झाला होता. त्यातून ज्यावेळी या चित्रपटाचा पहिला भाग आला होता. तेव्हाही या चित्रपटाची बरीच चर्चा होती. 

द सेक्रेड गेम्स : 

'द सेक्रेड गेम्स' नेटफ्लिक्स आता उपलब्ध आहे. आता आपण काही चित्रपटांविषयी जाणून घेतले आहे आता पाहूया काही वेबसिरिजबद्दल. 2018 साली आलेली वेबसिरिज तुम्हाला माहितीये का? ती म्हणजे सेक्रेड गेम्स ही. या वेबसिरिजवरून बराच वाद झाला होता. या सिरिजमधून दाखवण्यात आलेल्या दृश्यांवर बंदी आणण्याची मागणी केली होती. 

बंडित क्विन : 

बंडित क्वीन हा एक बॉयपिक होता. जो फुलन देवी यांच्या जीवनावर आधारित होता. हा चित्रपट बॅनही करण्यात आला होता. त्यामुळे या चित्रपटाची जोरात चर्चाही रंगलेली होती. आता हा चित्रपट तुम्ही अॅमझॉन प्राईम व्हिडीओवरही पाहू शकता.  

पद्मावत : 

संजय लीला भन्साळी यांचा 'पद्मावत' हा चित्रपटही वादाच्या भोवऱ्यात अडकला होता त्यामुळे त्याची जोरात चर्चा होती. यावर बंदी आणण्याचीही मागणी केली होती. आता हा चित्रपट तुम्ही अॅमेझॉन प्राईमवर पाहू शकता.

तांडव :

तांडव ही वेबसिरिजही प्रचंड कॉन्ट्रोव्हर्शियल होती. ही वेबसिरिज तुम्ही अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर पाहू शकता. 

आश्रम : 

आश्रम ही वेबसिरिज देखील प्रचंड लोकप्रिय झाली होती. त्यामुळे या वेबसिरिजचीही प्रचंड चर्चा होती. हा वेबसिरिज एम एक्स प्लेअरवर उपलब्ध आहे.  

मिर्झापूर : 

'मिर्झापूर' ही वेबसिरिजही प्रचंड वादाच्या भोवऱ्यात होती. त्यामुळे या मालिकेची जोरात चर्चा होती. ही वेबसिरिज अॅमेझॉन प्राईमवर उपलब्ध आहे.