'हे' आहेत 'चित्रभूषण' आणि 'चित्रकर्मी' पुरस्काराचे मानकरी

चित्रपट क्षेत्रात बहुमूल्य योगदान देणाऱ्या मान्यवरांना देण्यात येणारे 'चित्रभूषण' आणि 'चित्रकर्म' पुरस्कार अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे जाहीर करण्यात आले आहेत. 

Updated: Aug 7, 2019, 09:30 PM IST
'हे' आहेत 'चित्रभूषण' आणि 'चित्रकर्मी' पुरस्काराचे मानकरी title=

प्रशांत अनासपुरे, झी मीडिया, मुंबई : चित्रपट क्षेत्रात बहुमूल्य योगदान देणाऱ्या मान्यवरांना देण्यात येणारे 'चित्रभूषण' आणि 'चित्रकर्म' पुरस्कार अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे जाहीर करण्यात आले आहेत. 

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे देण्यात येणारा 'चित्रभूषण' पुरस्कार यंदा ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, भालचंद्र कुलकर्णी, ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी, सुषमा शिरोमणी तसेच ज्येष्ठ कलादिग्दर्शक श्रीकांत धोंगडे, निर्माते किशोर मिस्कीन यांना जाहीर झाला आहे. 

शाल, श्रीफळ आणि ५१,०००/- रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्कारांचे वितरण सोमवार १९ ऑगस्ट रोजी रविंद्र नाट्यमंदिर येथे सायंकाळी ६.०० वाजता करण्यात येणार आहे.

रमेश साळगांवकर, संजीव नाईक, विलास उजवणे, आप्पा वढावकर, नरेंद्र पंडीत, प्रशांत पाताडे, दिपक विरकूड, विलास रानडे, विनय मांडके, जयवंत राऊत, सतीश पुळेकर, प्रेमाकिरण, सविता मालपेकर, चेतन दळवी, अच्युत ठाकूर, वसंत इंगळे या कलाकर्मीना 'चित्रकर्मी' पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. शाल, श्रीफळ आणि ११,००० /- रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. अशी माहिती चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी दिली आहे.