गौरी खान आणि शाहरुख खानमध्ये कडाक्याचं भांडण; व्हिडिओ व्हायरल होताच घटस्फोटाच्या चर्चा सुरु

शाहरुख खान पठान सिनेमामुळे खूप चर्चेत होता. या सिनेमाने कमाईच्या बाबतीत बऱ्याच सिनेमांचे रेकॉर्ड मोडले होते. मात्र आता हा अभिनेता त्याच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आला आहे. लवकरच अभिनेता पत्नीपासून वेगळा होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

Updated: Apr 10, 2023, 08:14 PM IST
गौरी खान आणि शाहरुख खानमध्ये कडाक्याचं भांडण; व्हिडिओ व्हायरल होताच घटस्फोटाच्या चर्चा सुरु title=

Shah Rukh Khan and Gauri Khan : शाहरुख खान (Shah Rukh Khan आणि गौरी खान ही बॉलिवूडची सर्वात लाडकी जोडी आहे. अनेकदा हे कपल अनेक कार्यक्रमात एकत्र दिसतात. कधी डिनर डेटवर जातात. तर कधी वेकेशनला जाताना हे कपल स्पॉट होतं. तर कधी पुर्ण फॅमिलीसोबत स्पॉट होत. तर बऱ्याचदा ही जोडी बॉलिवूडच्या अनेक इव्हेंट्सला जाताना स्पॉट होतात. नुकतीच ही जोडी ता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NMACC)लॉन्च इवेंटला पोहचली होती. या जोडीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामुळे शाहरुख आणि गौरी  (Gauri Khan) चर्चेत आले आहेत. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये  शाहरुख खान भर कार्यक्रमात गौरीवर ओरडताना दिसत आहे. 

शाहरुख खान पठान सिनेमामुळे खूप चर्चेत होता. या सिनेमाने कमाईच्या बाबतीत बऱ्याच सिनेमांचे रेकॉर्ड मोडले होते. आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांना वेड लावणार शाहरुख खान या दिवसांत आपली पत्नी गौरी खानमुळे चर्चेत आहे. एवढंच नव्हेतर त्यांच्या व्हायरल व्हिडिओमुळे त्यांच्यात बिनसल्याच्या बातम्या सध्या व्हायरल होत आहेत. एवढंच नव्हेतर हे कपल लवकरच वेगळं होणार असल्याचंही म्हटलं जात आहे. 

व्हायरल व्हिडिओमगचं सत्य
सध्या सोशल मीडियावर शाहरुख आणि गौरी खानचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शाहरुख खान मात्र जबरदस्त ट्रोल होत आहे. तर काही लोकांचं म्हणणं आहे की, शाहरुख खान या व्हिडिओमध्ये मद्यपान केल आहे. म्हणून तो त्याची पत्नी गौरी खानवर रागवला आहे. म्हणूनच तो भर कार्यक्रमात आपल्या पत्नीवर चिडला आहे आणि तिच्यावर तो ओरडत आहे. Shah Rukh Khan Troll)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

काही युजर्सचं असं म्हणणं आहे की, या दोघांमध्ये दुरावा आला आहे. व्हायरल व्हिडिओत आपण पाहू शकतो की, गौरी खान डान्स एन्जॉय करत असताना तिथे शाहरुख पोहचतो आणि तिच्यावर जोरजोरत ओरडू लागतो. यानंतर गौरी देखील त्याच्याशी बोलू लागते. आणि नंतर डान्स परफॉर्मन्स एन्जॉय करु लागते. मात्र जरी हा व्हिडिओ व्हायरल होत असला आणि यामागे विचीत्र चर्चा होत असल्या तरी या दोघांनी या बातम्या स्पष्टीकरण दिलेलं नाहीये. त्यामुळे खरंच या जोडीमध्ये काही बिनसलंय की, या अफवा आहेत हे अद्याप समजलेलं नाही.