मुंबई : महानायक अमिताभ बच्चन यांच्या सोबत काम करण्याची प्रत्येक उभरत्या कलाकाराची इच्छा असते. काहींची ही ईच्छा पूर्ण होते, तर काहींना प्रतीक्षा करावी लागते. दरम्यान बिग बींसोबत काम केलेल्या तरूणीवर तर आता चक्क Momos विकण्याची वेळ आली आहे. या तरूणीचे नाव सुचिस्मिता राउत्रे (Suchismita Routray) असं आहे. सुचिस्मिता एक महिला कॅमेरापर्सन आहे. तिने आतापर्यंत अनेक बड्या कालाकारांसोबत काम केलं आहे. यामध्ये अनेक इंडस्ट्रीमधील मोठे कलाकार सामील आहेत.
करियरचं उंच डोंगरावर चढणाऱ्या सुचिस्मिताचं जीवन आता पूर्णपणे बदललं आहे. ती बॉलिवूडचा भाग नाही राहिली. सुचिस्मिताने तिच्या आर्थित परिस्थितीबद्दल भाष्य केलं. कोरोना काळात फक्त बॉलिवूडचं नाही तर सर्वच क्षेत्रांना मोठा फटका बसला. त्यामुळे कित्येकांना आपलं आवडतं क्षेत्र सोडून दुसरं काम शोधावं लागलं.
सुचिस्मिता सोबत देखील असं झालं आहे. कोरोना काळात तिला आर्थिक चणचण भासत होती. यावेळी तिला अमिताभ बच्चन आणि सलमान खानने मदत केली. त्यामुळे सुचिस्मिता तिच्या गावी ओडिशाला पोहोचू शकली. कोरोनानंतर सुचिस्मिताच्या जीवनात मोठे बदल झाले. बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या सुचिस्मितावर आता मोमोस विकण्याची वेळ आली.
सुचिस्मिताने अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, आलिया भट्ट, वरुण धवन, सुशांत सिंह राजपूत यांसारख्या कलाकारांसोबत काम केलं आहे. बॉलिवूमध्ये तिने मोठ्या बॅनर खाली काम केलं आहे. पण आता मात्र ती मोमोज विकून फक्त 300-400 रूपये कमवते. कोरोनामुळे माझं प्रचंड नुकसान झालं असल्याचं सुचिस्मिताने सांगितलं आहे.
सुचिस्मिताने 2015साली मुंबईत आली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने सिनेविश्वाकडे आपला मोर्चा वळवला. तब्बल ६ वर्ष तिने सहाय्यक कॅमेरापर्सन म्हणून काम केलं. सुचिस्मिता आता तिच्या आईसोबत राहात आहे. तिच्या घरात कमवणारी ती एकटीचं आहे. सुचिस्मिताच्या वडिलांचं निधन झालं आहे.