नेहा कक्करच्या घरी होळीची दमदार सुरूवात; स्विमिंग पूलमधील डान्स व्हायरल

नेहा सध्या तिच्या कुटुंबासोबत स्विमिंगपूलमध्ये होळीचा आनंद लुटताना दिसत आहे. 

Updated: Mar 26, 2021, 01:24 PM IST
नेहा कक्करच्या घरी होळीची दमदार सुरूवात; स्विमिंग पूलमधील डान्स व्हायरल  title=

मुंबई : प्रसिद्ध गायक नेहा कक्करच्य चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. नेहा कायम तिच्या  सौंदर्याने आणि गोड आवाजाने चाहत्यांना घाळाळ करते. आता देखील नेहाच्या एका व्हिडिओची चर्चा जोरदार सुरू आहे. नेहा सध्या तिच्या कुटुंबासोबत स्विमिंगपूलमध्ये होळीचा आनंद लुटताना दिसत आहे. आता नेहाच्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पती रोहनप्रीत आणि  भाऊ टोनी कक्कर देखील दिसत आहे. नेहा पूलमध्ये पती रोहनप्रीत सोबत मस्ती करताना दिसत आहे.

नेहाने हा व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्राम अकाउंट पोस्ट केला आहे. तिचा हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओत  नेहा आणि रोहनप्रीतची केमेस्ट्री दिसून येत आहे. नेहाचं पूर्ण कुटुंब प्री होळी साजरी करताना दिसत आहे. व्हिडिओत लहानांपासून मोठ्यांनी देखील गाण्यांवर ताल धरला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Neha Kakkar (Mrs. Singh) (@nehakakkar)

नेहाने हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये 'मारू पिचकारी होके लेफ्ट, होके राइट...' असं लिहिलं आहे. लग्नानंतर नेहाची पहिली होळी असल्यामुळे ती अत्यंत आनंदी  दिसत आहे. नेहा  तिची पहिली होळी ऋषिकेशमधील  तिच्या घरी साजरी करत आहे. 

नेहाचा होळीचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तिने हा व्हिडिओ काही तासांपूर्वीच पोस्ट केला आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ 1.9 मिलियन पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. हजारो लोकांनी नेहाचा होळी व्हिडिओ लाईक देखील केला.