'रात्रीस खेळ चाले' मधील शेवंतावर ओढावला धक्कादायक प्रसंग, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

झी मराठीवरील 'रात्रीस खेळ' चाले ही मालिका एकेकाळी प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचली होती. अवघ्या वेळातच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला सुरुवात झाली होती. मात्र या मालिकेतील शेवंतासोबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे.

Updated: Apr 23, 2023, 07:29 PM IST
'रात्रीस खेळ चाले' मधील शेवंतावर ओढावला धक्कादायक प्रसंग, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण title=

मुंबई : झी मराठीवरील 'रात्रीस खेळ' चाले ही मालिका एकेकाळी प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचली होती. अवघ्या वेळातच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला सुरुवात झाली होती. या मालिकेचे तीन भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. मालिकेचे तिनही भाग प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. या मालिकेला जसा प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला तसाच या मालिकेतील प्रत्येक पात्रावर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं आहे. अण्णा आणि शेवंता ही जोडी तर प्रेक्षकांनी उचलून धरली होती. 

मादक अदांनी सर्वांनाच भूरळ घालणारी शेवंता असो. प्रत्येक पात्र सर्वांनाच हवंहवंसं वाटू लागलं. शेवंता म्हणून घरांघरात पोहचलेली अपूर्वा नेमळेकर हिनं एकाऐकी या मालिकेतून अचानक एक्झिट घेतली आणि या मालिकेतील नव्या शेवंतासाठी प्रेक्षकवर्ग उत्सुक झाला.  

कोकणची पार्श्वभूमी, एका कुटुंबात घडणाऱ्या काही घडामोडी आणि त्यातून उदभवणारे भयावह प्रसंग यावर आधारित 'रात्रीस खेळ चाले' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. आणि शेवंता म्हणून अभिनेत्री कृतिका तुळसकरने या मालिकेत एंट्री घेतली. अवघ्या काही वेळातच कृतिकालाही प्रेक्षकांनी पसंती दर्शवली. तिचंही शेवंता हे पात्र प्रेक्षकांना तिच्या प्रेमात पाडू लागलं.

अभिनेत्री कृतिका तुळसकर मागील 18 वर्षांपासून ती रंगभूमी आणि मालिका जगतात सक्रिय आहे. ती कथ्थक विशारद आहे. प्रोफेशनली ती सायकोलॉजिस्ट असली तरीही अभिनयाची आवडही जोपासत आहे. मात्र नुकतंच कृतिकासोबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत घडलेला सगळा प्रकार सांगितला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 खंरतर कृतिकाच्या घरी एक पाळीव मांजर होतं. ते पाळीव मांजर तिच्या सोसायटीमधी व्यक्तीमुळे तिला घरातून बाहेर काढावं लागलं. यानंतर तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत एक विनंती तिच्या चाहत्यांना केली होती की, तिच्या पाळीव मांजरला कोणी घर देईल का? तिच्या या पोस्टनंतर तिला पेट अॅडोपशनमधून पोलिसांपर्यंत पोहचवलं आणि तिला तिचं माजंर तिच्या घरी ठेवण्यासाठी मदत केली. हा सगळा प्रकार तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. सोशल मीडियावर पोस्टमध्ये एक फोटो शेअर करत कृतिकाने कॅप्शनमध्ये लिहीलंय की, सर तुमच्या मुळे आज माझी चीकू पुन्हा माझ्या कड़े आली .तुमचे खुप खुप आभार.