मुंबई : असे अनेक सेलिब्रिटी आहेत. ज्यांनी एकेकाळी सिनेसृष्टी गाजवली आहे. असा एक काळ होता जेव्हा प्रेक्षक लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, सचिन पिळगावकर, महेश कोठारे, वर्षा उसगावकर, निवेदिता सराफ, प्रिया बेर्डे, सुप्रिया पिळगावकर या कालाकारांच्या सिनेमाची आतुरतेने वाट पाहायचे. या कलाकारांचे जवळ-जवळ सगळेच सिनेमा हिट झाले आहेत. जितके हे कलाकार त्याच्या प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असायचे तितकीच चर्चा त्यांच्या पर्सनल लाईफ विषयी व्हायची. आज आम्ही तुम्हाला एका अशा अभिनेत्रीबद्दल काही खास गोष्टी सांगणार आहोत. जे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
आम्ही बोलत आहोत, ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्याबद्दल. आज अभिनेत्री तिचा ५६वा वाढदिवस साजरा करत आहेत. वर्षा उसगावकर यांनी ९० च्या दशकात अधिराज्य गाजवलं. मराठीसह बॉलीवूडमध्ये त्यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. वर्षा उसगावकर ही अभिनेत्री अच्युत उसगावकर यांटी मुलगी आहे. अच्युत उसगावकर मगो पक्षाचे नेते होते. आमदार व मंत्री म्हणून 70 च्या दशकात उसगावकर यांनी नाव कमावलेआजही या अभिनेत्रीचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. असं कोणी क्ववचितच असेल ज्यांना या अभिनेत्रीविषयी माहिती नसेल. वर्षा उसगावकर यांनी आत्तापर्यं सिनेसृष्टीला एकापेक्षा एक हिट सिनेमा दिले आहेत. मात्र तुम्हाला माहितीये का? मुंबईत आल्यानंतर वर्षा यांचं बाळासाहेब ठाकरे यांच्या शेजारीच घर होतं.
नुकतीच वर्षा यांनी लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, ''स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं घर माझ्या शेजारी होतं. त्यामुळे मला छान २४ तास पोलीस प्रोटेक्शन असायचं. कलानगरला जाताना मला कधीही भीती वाटली नाही. रात्रीचे दोन-तीन किंवा चार वाजूदे तिथे कायम पोलिसांचा बंदोबस्त असायचा. माझी त्यांच्याशी अनेकदा भेट झालीये. ते माझ्याशी खूप गप्पा मारायचे. मला छान-छान गोष्टी सांगायचे. त्यांचा स्वभाव फार खेळकर होता.
बाळासाहेब खूप मार्मिक बोलायचे. काय गं गोव्याची मुलगी, तू कशी काय गोव्यावरून इथे आलीस? एकदा माझी आई आणि मी आम्ही त्यांना भेटायला गेलो होतो. त्यावेळी आम्हाला त्यांनी अनेक जोक्स आणि किस्से वगैरे सांगितले. मी बिअर पितो पण कॅलरीशिवाय हा… असा त्यांचा गमतीशीर स्वभाव होता. त्यांचा स्वभाव मला खूप आवडायचा.ज्या बाळासाहेब ठाकरेंबद्दल वृत्तपत्रात लिहून येतं, तेच माझ्या शेजारी राहतात. मला दररोज त्यांचं दर्शन व्हायचं. त्याकाळी महाराष्ट्र म्हणजे बाळासाहेब ठाकरे हे वेगळं समीकरण तयार झालं होतं. त्यामुळे एवढ्या मोठ्या माणसाचं दररोज दर्शन, त्यांच्या शेजारी राहणं ही माझ्यासाठी मोठी गोष्ट होती.'' असं त्यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं.