ऐश्वर्या राय बच्चन आणि नव्या नवेलीचा एकत्र फोटो व्हायरल

गेल्या काही दिवसांपासून अमिताभ बच्चन यांची सून ऎश्वर्या राय बच्चन आणि नात नव्या नवेली नंदा यांचे काही फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहेत.

Amit Ingole Amit Ingole | Updated: Aug 10, 2017, 04:54 PM IST
ऐश्वर्या राय बच्चन आणि नव्या नवेलीचा एकत्र फोटो व्हायरल title=

नवी दिल्‍ली : गेल्या काही दिवसांपासून अमिताभ बच्चन यांची सून ऎश्वर्या राय बच्चन आणि नात नव्या नवेली नंदा यांचे काही फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहेत.

नुकतीच नव्या नवेली बच्चन परिवारासोबत मुंबईत झालेल्या ‘वोग ब्यूटी अवॉर्ड्स’ इव्हेंटमध्ये दिसली होती. यावेळी असलेल्या नव्याचा स्टायलिश अंदाजाची चांगलीच तारीफ झाली. या कोणतीही शंका नाहीये की, नव्या आणि तिची मामी ऎश्वर्या राय बच्चन ही या फोटो सुंदर दिसताहेत.

या इव्हेंटमध्ये जया बच्चन, अमिताभ बच्चन, त्यांची मुलगी श्वेता बच्चन आणि नात नव्या नवेली यांनी एकत्रच एन्ट्री घेतली. त्यानंतर थोड्या वेळाने ऎश्वर्या या इव्हेंटमध्ये सामिल झाली. त्यानंतर नव्या आणि ऎश्वर्याचे अनेक फोटो पसंत केले जात आहेत. त्यातील हा फोटो अधिकच पसंत केला जात आहे. 

दरम्यान, बच्चन परिवाराच्या तीन पिढ्या म्हणजेच जया बच्चन, श्वेता नंदा आणि तिची मुलगी नव्या नवेली वोग इंडिया मॅगझिनच्या कव्हर पेजवर एका वेगळ्याच अंदाजात दिसले होते. जया आणि त्यांची मुलीने गोल्डन गोल्डन रंगाचा वेस्टर्न ड्रेस परिधान केला होता. तर जया बच्चन यांची नात नव्याने व्हाईट रंगांचा सुंदर गाऊन परिधान केला होता.