'दिल चाहता है'नं या अभिनेत्रीला दिली नवी ओळख

अनेक दिवस तरुणांच्या गळ्यातला ताईत ठरलेल्या 'दिल चाहता हैं' या सिनेमाला १६ वर्ष पूर्ण झालीत. हा सिनेमा मराठमोळ्या सोनाली कुलकर्णीच्या करिअरमधला महत्त्वाचा टप्प ठरल्याचं सांगत तिनं आपल्या आठवणींना उजाळा दिलाय. 

Updated: Aug 10, 2017, 04:15 PM IST
'दिल चाहता है'नं या अभिनेत्रीला दिली नवी ओळख title=

मुंबई : अनेक दिवस तरुणांच्या गळ्यातला ताईत ठरलेल्या 'दिल चाहता हैं' या सिनेमाला १६ वर्ष पूर्ण झालीत. हा सिनेमा मराठमोळ्या सोनाली कुलकर्णीच्या करिअरमधला महत्त्वाचा टप्प ठरल्याचं सांगत तिनं आपल्या आठवणींना उजाळा दिलाय. 

अभिनेता आमिर खान, सैफ अली खान, अक्षय खन्ना, प्रीती झिंटा आणि सोनाली कुलकर्णी स्टारर 'दिल चाहता हैं' हा सिनेमा २००१ साली १० ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला होता. १६ वर्षानंतरही या चित्रपटाची क्रेझ कायम आहे. 

या सिनेमाच्या आठवणी सांगताना सोनाली हळवी झाली. 'या चित्रपटाची कास्टिंग झोया अख्तरने केली होती. झोयानेच माझी या सिनेमासाठी निवड केली होती. हा सिनेमा माझ्या कारकिर्दीत महत्वाचा आहे. कारण त्यामुळेच मला बॉलीवूडमध्ये ओळख मिळाली. माझा कम्लिट मेकओव्हर झाला. कसे कपडे घालावेत. कलर-कॉम्बिनेशन काय हवं ते पर्स कोणती असावी, याबाबतीत मी सजग झाले' असं सोनालीनं म्हटलंय.


वो लडकी है कहा़ँ

सोनालीचा तो वाढदिवस...

'दिल चाहता हैं' सिनेमात सैफ अली खानच्या गर्लफ्रेंड पूजाच्या भूमिकेत सोनाली कुलकर्णी दिसली होती. त्या आठवणी जागवताना सोनाली सांगते, 'आमिर, सैफ, अक्षय असे मोठे स्टार या सिनेमात होते. पण ते तिघेही किती विनम्र आहेत, ते मला त्यांच्यासोबत काम केल्याने कळलं. सिनेमाच्या चित्रीकरणा दरम्यान माझा वाढदिवसही साजरा झाला. त्यावेळी सगळ्यांनी माझ्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. तो वाढदिवस आठवणीतला होता.'

'दिल चाहता हैं' मधलं 'वो लडकी है कहाँ' हे गाणं सोनाली-सैफवर चित्रीत झालं होतं, तेव्हांची गंमत सोनाली शेअर करते. ती म्हणते, 'गाण्याची कोरीओग्राफी फराह खानने केली होती. गाण्याच्या स्टेप्स एवढ्या मजेशीर होत्या, की, मलाच काय बाकी स्टारकास्टला ही त्या करताना खूप हसू येतं होतं. पण पहा, ते गाणं आज किती संस्मरणीय झालंय.'