...म्हणून त्याने दुकानाला दिलं सोनू सूदचं नाव, तर सोनू सूदने दिली अशी प्रतिक्रिया

आपल्या दुकानाला दिलं सोनू सूदचं नाव 

Updated: Jul 20, 2020, 04:03 PM IST
...म्हणून त्याने दुकानाला दिलं सोनू सूदचं नाव, तर सोनू सूदने दिली अशी प्रतिक्रिया title=

मुंबई : कोरोनाच्या संकटात लॉकडाऊनमध्ये बॉलिवूड अभिनेता सोनू सूद यांने प्रवासी मजुरांना खूप मदत केली होती. सोनू सूद गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या घरांमध्ये, त्यांच्या गावांमध्ये मोठ्या शहरात अडकलेल्या मजुरांना त्यांच्या गावी पाठवण्याचं काम करत आहे. अशा परिस्थितीत हे कामगार सोनूवरील प्रेम वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त करीत आहेत. कोणी आपल्या मुलाचे नाव सोनू ठेवले आहे तर कोणी त्याला पुन्हा भेटण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, सोनू सूदच्या मदतीमुळे घरी पोहोचलेल्या एका व्यक्तीने आपल्या दुकानाला सोनू सूदचे नाव देऊन कृतज्ञता व्यक्त केली आहे.

अहवालानुसार सोनू सूद याने अडकलेल्या मजुरांना केरळहून ओडिशा येथे विशेष विमानाची व्यवस्था केली होती. या उड्डाणात बसून हा माणूस ओडिशाला कोची येथून आपल्या गावी पोहोचला होता. त्याचे स्वतःचे वेल्डिंग शॉप आहे. त्याने त्याच्या दुकानाचे नाव सोनू सूद वेल्डिंग वर्क शॉप असे ठेवले गेले आहे. जेव्हा सोनू सूदला हे कळले तेव्हा त्याने म्हटसं की, 'हा सर्वात मोठा ब्रँड आहे. मी यासाठी जाहिरात करेल. देव करो तू सर्वात श्रीमंत उद्योजक होशील माझा भावा.'

अभिनेता सोनू सूद गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत होता. सोनूने प्रवासी मजुरांना लॉकडाऊनमध्ये त्यांच्या गावी पाठवून मोठं काम केलं. सोनू सूद याने शेकडो स्थलांतरित कामगारांना त्यांच्या घरी पोहोचवले आणि हे काम अजूनही सुरू आहे. काही दिवसांपूर्वी सोनू सूद याने महाराष्ट्र पोलिसांना 25000 फेस शील्डसुद्धा दिल्या आहेत.

याबाबत महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करून सोनू सूद यांचे आभार मानले होते. सोनू सूदसोबत फोटो शेअर करताना त्यांनी लिहिले की, सोनू सूद यांच्या उदार योगदानाबद्दल मी त्यांचे आभारी आहे. सोनू सूद यांनी पोलिसांना 25000 फेस शील्ड दिली आहेत.

यावर प्रतिक्रिया देताना सोनू सूदने म्हटलं की, 'तुमच्या बोलण्याने माझा सन्मान झाला. माझे पोलीस भाऊ आणि बहीण आमचे खरे नायक आहेत. ते करत असलेल्या कामापुढे हे फारच लहान आहे. जय हिंद.'