The Kerala Story फेम अदा शर्मा वाढदिवसाच्या दिवशी शंकराच्या मंदिरात; 'शिवतांडव’चा जप करतानाचा Video Viral

Adah Sharma Birthday : द केरला स्टोरी फेम अदा शर्मानं तिच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज मंदिरात जाऊ शिवलिंगाची प्रार्थना केली आहे. त्यासोबत तिनं शिवतांडवचा जप केला आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून त्यावर अनेकांनी कमेंट करत त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

दिक्षा पाटील | Updated: May 11, 2023, 02:42 PM IST
The Kerala Story फेम अदा शर्मा वाढदिवसाच्या दिवशी शंकराच्या मंदिरात; 'शिवतांडव’चा जप करतानाचा Video Viral title=
(Photo Credit : Adah Sharma Instagram)

Adah Sharma Birthday : बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा ही सध्या तिच्या 'द केरला स्टोरी' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. 'द केरला स्टोरी' चित्रपटाबाबत संपूर्ण भारतात वाद सुरु असताना दुसरीकडे बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट बक्कळ कमाई करत आहे. रोजच्या दिवसात चित्रपटाच्या कमाईत वाढ होताना दिसत आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर अनेक लोकप्रिय कलाकारांच्या चित्रपटाला मागे टाकलं आहे. तर आज अदाचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्तानं अदानं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अदा शिवलिंगासमोर असून शिवतांडव म्हणत आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

अदाचा आज 11 मे रोजी वाढदिवस आहे. अदाचा जन्म 11 मे 1992 साली झाला होता. आज अदा तिचा 31 वा वाढदिवस साजरा करत आहे.  अदानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. शिवलिंगाचं दर्शन घेत अदानं तिच्या वाढदिवसाच्या दिवसाची सुरुवात केली आहे. या व्हिडीओत अदा मंदिरातील शिवलिंगासमोर बसलेली दिसत आहे. ती नियमानुसार शिवतांडव म्हणत असल्याचे दिसत आहे. व्हिडीओत अदानं पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत अदानं कॅप्शन दिलं की, ‘माझ्या उर्जेचे रहस्य. ऊर्जा जी मला निर्बंधांचा सामना करण्यास मदत करते. तुम्ही मला आपलेसे करून घेतलेत त्यासाठी तुमचे आभार. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अदाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. तिच्या या व्हिडीओवर नेटकरी विविध कमेंट करत आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करेल हे महत्त्वाचं नाही तर या चित्रपटामुळे किती मुलींचे डोळे उघडतील हे महत्त्वाचं आहे.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'केरला स्टोरीच्या माध्यामातून कोटींच्या संख्येत असलेल्या हिंदूनंचे डोळे उघडण्यासाठी धन्यवाद.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'आम्हाला तुझ्यासारख्या कलाकारांची गरज आहे.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'तुम्ही केरला स्टोरी चित्रपट बनवण्याची हिंम्मत केली ही खूप मोठी गोष्ट आहे.' 

हेही वाचा : TMKOC मधील आणखी एका अभिनेत्रीचे असित मोदींवर गंभीर आरोप; शोही सोडला

'द केरला स्टोरी' विषयी बोलायचं झालं तर चित्रपटानं 60 कोटींचा आकडा पार केला आहे. या चित्रपटानं सहाव्या दिवशी 12 कोटींची कमाई करत बॉक्स ऑफिसवर एकूण 68.86 कोटी कमावले आहेत. आता हा चित्रपट लवकरच 100 कोटींचा आकडा पार करणार अशी अपेक्षा त्यांच्या चाहत्यांना लागली आहे.