The Accidental Prime Minister ट्रेलर यूट्यूबवरून गायब

अनुपम खेर यांनी केलं ट्विट

The Accidental Prime Minister ट्रेलर यूट्यूबवरून गायब title=

मुंबई : अनुपम खेर यांचा आगामी सिनेमा The Accidental Prime Minister हा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचे मीडिया सल्लागार संजय बारू यांच्या पुस्तकावर आधारित हा सिनेमा आहे. या सिनेमात डॉ मनमोहन सिंह यांची भूमिका अनुपम खेर साकारत आहे. 

महाराष्ट्रातील अनेक काँग्रेस नेत्यांनी या सिनेमाला विरोध केला आहे. सिनेमात गांधी कुटुंबियांची चुकीची बाजू दाखवण्यात आल्याच आरोप करण्यात आला आहे. 

सिनेमाला विरोध दर्शवल्यानंतर अनुपम खेर यांनी सिनेमाबाबत जाहिर चिंता व्यक्त केली होती. त्यांच असं म्हणणं आहे की, सिनेमाचा ट्रेलर ट्रेंडमध्ये आहे. पण चाहत्यांच असं म्हणणं आहे की, ट्रेलर यूट्यूबवर दिसत नाही. 

त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, डिअर यूट्यूब मला फोन आणि मॅसेजेस येत आहेत की, देशाच्या अनेक ठिकाणी यूट्यूबवर The Accidental Prime Minister trailer टाइप करून सर्च केल्यावर काही दिसत नाही.

आणि दिसलं तर ते अगदी खाली 50 व्या स्थानावर आहे. आम्ही 1 नंबरवर ट्रेंड करत होतो कृपया मदत करावी. आता यूट्यूबवर ट्रेलर 18 व्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे. 

तसेच अनुपम खेर यांनी चाहत्यांनी पाठवलेले स्क्रिन शॉर्ट देखील शेअर केले आहे. आतापर्यंत हा ट्रेलर जवळपास 39,334,104 हून अधिक लोकांनी पाहिला आहे. हा सिनेमा 11 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

या सिनेमात अनुपम खेर यांच्यासोबत अक्षय खन्ना, अर्जुन माथुर, बिपिन शर्मा, दिव्या सेठी महत्वाच्या भूमिकेत आहे. हा सिनेमा विजय रत्नाकर गुट्टे यांनी दिग्दर्शित केला असून संजय बारू यांची भूमिका अक्षय खन्नाने साकारली आहे.