...म्हणून परिणीती करणार नाही आयपीएलमध्ये परफॉर्म!

 ७ एप्रिलपासून आयपीएलचे ११ वे सीजन सुरु होत आहे.

Updated: Apr 6, 2018, 03:23 PM IST
...म्हणून परिणीती करणार नाही आयपीएलमध्ये परफॉर्म! title=

मुंबई : ७ एप्रिलपासून आयपीएलचे ११ वे सीजन सुरु होत आहे. या सीजनच्या ओपनिंगला बॉलिवूड कलाकारांचा धमाकेदार तडका लागणार असल्याची चर्चा होती. मात्र खांद्याच्या आजाराने त्रस्त अभिनेता रणवीर सिंग आता परफॉर्म करु शकणार नाही. त्यानंतर अभिनेत्री परिणीती चोप्रानेही आयपीएल-२०१८ मध्ये सादरीकरण देणार नाही. परिणीती चोप्रा सध्या तिच्या आगामी सिनेमात नमस्ते लंडनच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. 

हे आहे कारण

सध्या ती पटियालामध्ये शूटिंग करत आहे आणि अत्यंत व्यस्त शेड्यूल असल्याने परिणीतीने या इव्हेंटचे आयोजन करणाऱ्या विजक्राफ्ट टीमशी बोलताना सांगितले की, व्यस्त शेड्यूलमुळे परफॉर्मची प्रॅक्टीस करु शकली नाही आणि याबद्दल ती कोणतीही तडजोड करु इच्छित नाही. त्यापेक्षा परफॉमन्स न केलेला बरा. विजक्राफ्टच्या टीमला परिणीतीचे म्हणणे पटले आणि आता ती या इव्हेंटचा भाग नाही आहे.

मात्र या सेलिब्रेटींचा जलवा कायम

तर रणवीर सिंगही खांद्याला दुखापत झाल्याने आयपीएल २०१८ मध्ये परफॉर्म करु शकणार नाही. मात्र अभिनेता हृतिक रोशन आयपीएलच्या उद्घाटनप्रसंगी आपल्या नृत्याने चार चॉंद लावण्यास सज्ज झाला आहे. याशिवाय वरुण धवन आणि जॅकलिन फर्नांडीसचा जलवाही पाहायला मिळेल.