मुंबई : टीव्हीचे सर्वात लोकप्रिय जोडपे निकितिन धीर आणि कृतिका सेंगर यांचे घर गुंजणार आहे. निकितिन आणि कृतिका आई-वडील होणार आहेत. अभिनेत्री कृतिका सेंगर गर्भवती आहे. पुढच्या वर्षी ती तिच्या पहिल्या मुलाला जन्म देणार आहे.
कृतिका सेंगर होणार आई
कृतिका सेंगरने पती निकितन धीरसोबतचा फोटो शेअर करून गुड न्यूज दिली आहे. फोटोमध्ये कृतिका तिचा बेबी बंप फ्लॉंट करताना दिसत आहे. ती आणि तिचा नवरा निकितिन धीर एकमेकांना मिठी मारून उभे आहेत. आई-वडील झाल्याचा आनंद दोघांच्याही चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. कृतिकाच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे.
हा फोटो शेअर करत कृतिका सेंगरने कॅप्शन लिहिले - धीर ज्युनियर 2022 मध्ये येणार आहे.
गुडन्यूज समोर आल्यापासून चाहते आणि सेलिब्रिटी या जोडप्याचे अभिनंदन करत आहेत. अनिता राज, मनीष रायसिंघन, स्मृती खन्ना, अंकिता लोखंडे, अक्षरा सिंग, रिचा शर्मा, निधी उत्तम, किश्वर मर्चंट, नमन शॉ यांनी या जोडप्याचे अभिनंदन केले आहे. आई-वडील होण्यासाठी हे जोडपे खूप उत्सुक आहे.
दोघांच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, कृतिका सेंगर शेवटची टीव्हीवर छोटी सरदारनीमध्ये दिसली होती. कृतिका ही प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे. ती कसौटी जिंदगी की, झांसी की रानी, पुनर विवाह, सर्विस वाली बहू, कसम तेरे प्यार की यांसारख्या शोचा भाग आहे.
त्याचवेळी निकितन आगामी 'अनामी- द फायनल ट्रुथ' या चित्रपटात दिसणार आहे. अक्षय कुमारच्या सूर्यवंशी या चित्रपटातही तो दिसला होता.