मुंबई : झगमगत्या विश्वातील दुसरी काळी बाजू कायम सर्वांसमोर आली. अभिनेत्री सोबत होणार गैरव्यवहार कायम सर्वांसमोर येत राहिले. पण आता प्रसिद्ध दिग्दर्शकाने केलेल्या वक्तव्यामुळे कलाविश्वात खळबळ माजली आहे. 'कलाविश्वात स्थान मिळवण्यासाठी अभिनेत्री कोणत्याही थराला जातात...' दाक्षिणात्य सिनेमाचे दिग्दर्शिक, निर्माता आणि लेखक गीता कृष्णा यांनी नुकतेच कास्टिंग काउचबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे सर्वत्र हा मुद्द चर्चेचा विषय बनला आहे.
सध्या त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये गीता कृष्णा यांना 'जेव्हा तुम्ही करियरला सुरूवात केली, तेव्हा पासून ते आतापर्यंत तुम्हााल काय फरक वाटतो...' असा प्रश्न विचारण्यात आला.
या प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणाले, 'नक्कीचं फरक अनुभवला आहे... आता अभिनेत्री कमी वेळात यश मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जायला तयार होतात. त्या स्वतःला दिग्दर्शक आणि निर्मात्यांसमोर स्वतःला स्वाधीन करतात. आता अभिनेत्री शॉर्टकटचा पर्याय निवडतात...'
ते पुढे म्हणाले, 'पूर्वी असं काहीही नव्हतं... फिल्म इंडस्ट्रीतील कास्टिंग काउचने हनी ट्रॅपचे रूप धारण केले आहे.' गीता कृष्णा यांचं अभिनेत्रींबद्दल असलेलं वक्तव्य सध्या तुफान चर्चेत आहे.
फिल्म इंडस्ट्रीतील कास्टिंग काउच बद्दल सांगायचं झालं तर, रणवीर सिंग, कंगना रणौत, विद्या बालन, सुरवीन चावला, ममता कुलकर्णी, पायल रोहतगी, टिस्का चोप्रा, राधिका आपटे, स्वरा भास्कर यांच्यासह अनेक स्टार्स कास्टिंग काउचचे शिकार झाले आहेत.