Into the wildमध्ये रजनीकांतची धमाकेदार एंट्री; पाहा व्हिडिओ

'थलैवा'चं साहसी रुप.... 

Updated: Mar 1, 2020, 04:06 PM IST
Into the wildमध्ये रजनीकांतची धमाकेदार एंट्री; पाहा व्हिडिओ title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या नवावर राज्य करणाऱ्या अभिनेता रजनीकांत rajinikanth यांचं एक नवं आणि तितकंच बहुप्रतिक्षित रुप प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.  Man Vs Wild याच कार्यक्रमाचा एक भाग असणाऱ्या Into the wild मध्ये रजनीकांत सहभागी झाले आहेत. त्यामुळे आता बेअरच्या साथीने ते जंगलातील वाटांवर नेमके काय करणार याचीच उत्सुकता अनेकांना लागली आहे. 

प्रेक्षकांमध्ये ही उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच आता या कार्यक्रमाच्या खास भागाचा एक टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. अवघ्या काही सेकंदांच्या या टीझरमध्ये बेअरसोबतच रजनीकांत यांचा अनोखा लूक पाहता येत आहे. मुख्य म्हणजे 'थलैवा'चा लूक अद्यापही पूर्णपणे दाखवण्या आलेला नाही. पण, चाहत्यांसाठी तूर्तास ही झलकही पुरेशी ठरत आहे. 

२३ मार्चला कला विश्वातील 'थलैवा' आणि जगाच्या कानाकोपऱ्यात आव्हानांच्या प्रसंगांमध्येही आपला जीव कसा वाचवावा हे सातत्याने सांगणारा बेअर ग्रिल्स यांचा प्रवास प्रेक्षकांना पाहता येणार आहे. रात्रौ ८ वाजता हा खास भाग प्रदर्शित केला जाणार आहे.  भारतीय आणि जागतिक स्तरावरील प्रेक्षकांमध्येही या भागाविषयीची उत्सुकता आहे. 

वाचा : शाहरुखच्या 'स्वदेस'मध्ये झळकलेली अभिनेत्री आज एक 'बिझनेस वुमन'

काही दिवसांपूर्वीच बेअर ग्रिल्स या भागाच्या चित्रीकरणासाठी भारतात आला होता. यावेळी त्याने खिलाडी, अक्षय कुमार याच्यासोबतही एका भागाचं चित्रीकरण केल्याचं म्हटलं जात आहे. इनटू द वाईल्डमध्ये यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि इतरही बऱ्याच सेलिब्रिटींनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. तेव्हा आता या मंडळींप्रमाणेच रजनीकांत बेअरवर त्यांची छाप सोडणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.