वैवाहिक नात्यातून विभक्त होण्याच्या चर्चांमध्येच अभिनेत्रीची लक्षवेधी पोस्ट

छोट्या पडद्यावर ही अभिनेत्री आणि तिचा पती यांची जोडी चांगलीच चर्चेत होती   

Updated: Jan 13, 2020, 06:39 PM IST
वैवाहिक नात्यातून विभक्त होण्याच्या चर्चांमध्येच अभिनेत्रीची लक्षवेधी पोस्ट  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून छोट्या पडद्यावरील विश्वात कोणा एका नव्या मालिकेची नव्हे तर, एका सेलिब्रिटी जोडीच्या जीवनात आलेल्या वादळाची चर्चा सुरु आहे. वैवाहिक नात्यात आलेल्या वादळामुळे या जोडीने विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याचंही म्हटलं गेलं. ही जोडी म्हणजे अभिनेत्री संजीदा शेख आणि अभिनेता आमिर अली. 

आमिर आणि संजीदा यांच्या वैवाहिक नात्याची घडी विस्कटल्याच्या चर्चा सुरु असतानाच त्यांना एक चार महिन्यांची मुलगीही असल्याची बाब उघ़ड झाली. 'बॉम्बे टाईम्स'च्या वृत्तानुसार आमिर आणि संजीदाने सरोगसीच्या माध्यमातून या मुलीचं पालकत्व स्वीकारलं होतं. पण, त्यांनी बराच काळ ही बाब गुलदस्त्यात ठेवली. 

दरम्यान, आपल्या खासगी आयुष्याविषयी होणाऱ्या या सर्व चर्चा पाहून संजीदाने एक सोशल मीडिया पोस्ट केली. या पोस्टमध्ये तिने मला आपल्य़ा खासगी आयुष्य़ाची आणि गोपनीयतेची किंमत असल्याचं लिहिलं होतं. सूत्रांच्या माहितीनुसार संजीदाने मुलीसमवेत तिचं राहतं घर सोडलं आहे. सध्या ती तिच्या पालकांसोबत राहत आहे. 

पाहा उणे ४० अंश तापमानात भारतीय सैन्यातील जवान कसं करतात देशाचं रक्षण 

आमिर मात्र मुंबईतील लोखंडवाला परिसरात असणाऱ्या त्यांच्या घरीच राहत आहे. २०१२मध्ये टेलिव्हिजन विश्वातील या लोकप्रिय जोडीने लग्नगाठ बांधली होती. 'नच बलिये' या रिऍलिटी शोच्या तिसऱ्या पर्वाचं विजेपदही या जोडीने पटकावलं होतं. आता मात्र त्यांच्या नात्यात 'ऑल इज नॉट वेल' आहे, असंच चित्र दिसत आहे.