तेजश्री प्रधानचं छोट्या पडद्यावर पुनरागमन, झी मराठीची नवी मालिका

तेजश्रीच्या चाहत्यांसाठी खुशखबर...

Updated: Jul 4, 2019, 01:56 PM IST
तेजश्री प्रधानचं छोट्या पडद्यावर पुनरागमन, झी मराठीची नवी मालिका title=

मुंबई : झी मराठीवरील 'होणार सून मी या घरची' या मालिकेतून अभिनेत्री तेजश्री प्रधान ही महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली. इतकंच नव्हे तर ती महाराष्ट्राची लाडकी आणि आदर्श सून बनली. त्यानंतर तेजश्रीने चित्रपटात आणि नाटकात काम केलं. त्यामुळे छोट्या पडद्याला काही काळासाठी तिने रामराम ठोकला होता. पण तेजश्रीच्या चाहत्यांसाठी आता एक खुशखबर आहे. तेजश्री पुन्हा एकदा छोट्या पडद्याकडे वळणार आहे. 

झी मराठीवरील 'अग्गंबाई सासूबाई' या आगामी मालिकेत तेजश्री प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. तेजश्री सोबतच या मालिकेत निवेदिता सराफ, रवी पटवर्धन आणि गिरीश ओक हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. दिग्गज कलाकारांचा मेळ असलेली ही मालिका नक्कीच रंजक असेल यात शंकाच नाही. नुकतंच या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला आणि या प्रोमोमुळे प्रेक्षकांची मालिकेबद्दलची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.

तेजश्री प्रधानला पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहणं औस्त्युक्याच ठरेल. हि मालिका २२ जुलै पासून रात्री ८.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याचाच अर्थ 'तुला पाहते रे' ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.