कपिल शर्माला शाळेत शिक्षक म्हणायचे बिनकामाचा, असा सुरु झाला यशाचा प्रवास

टीव्हीचा प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा लवकरच OTT प्लॅटफॉर्म Netflix वर पदार्पण करणार आहे.

Updated: Jan 26, 2022, 08:32 PM IST
कपिल शर्माला शाळेत शिक्षक म्हणायचे बिनकामाचा, असा सुरु झाला यशाचा प्रवास title=

मुंबई : टीव्हीचा प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा लवकरच OTT प्लॅटफॉर्म Netflix वर पदार्पण करणार आहे. कपिलचा शो 'I am not done yet' 28 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शोमध्ये, कॉमेडियन नेहमीप्रमाणे सर्वांना हसवताना दिसेल, तसंच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या त्याच्या चाहत्यांना माहित नाहीयेत.

शोच्या रिलीजपूर्वी, त्याचे काही प्रोमो रिलीज झाले आहेत. जे खूप मजेदार आहेत, अशा परिस्थितीत, चाहते आता शो पाहण्यासाठी आतुर झाले आहेत. पण त्याआधीही कॉमेडियन अनुभव बस्सी यांनी कपिलची मुलाखत घेतली आहे. ज्यामध्ये तो कपिलशी मजेदार गप्पा मारताना दिसत आहे. कपिल जो आत्तापर्यंत स्टार्सच्या मुलाखती घेत होता. 

पण जेव्हा तो स्वतः मुलाखत देतो तेव्हा त्याला कसं वाटते हे देखील त्याने सांगितले आहे. यासोबत आणखी काही रंजक गोष्टीही त्याने शेअर केल्या आहेत. जसं कपिलने बस्सीला एका मुलाखतीत सांगितलं होतं की, त्याचे शिक्षक त्याला बिनकामाचा म्हणायचे, पण जेव्हा त्याने पहिल्यांदा स्टेजवर परफॉर्म केलं तेव्हा त्याला वाटलं की, आपण काहीतरी करू शकतो.

कधीपासून सुरु केली कॉमेडी...
मुलाखतीत कपिल म्हणाला, 'कॉलेजमध्ये झालेल्या युवा महोत्सवात मी पहिल्यांदा स्टेज परफॉर्मन्स केला. महोत्सवात नाटक, स्किट, हिस्ट्रीयॉनिक्स, माइम आणि मिमिक्री सारख्या गोष्टी असतात, म्हणून मी तिथे पहिल्यांदा हिस्टोरिओनिक्सचा प्रयत्न केला होता. मी पंच मारत होतो आणि लोकं हसत होती. मी बिनकामाचा आहे असं सांगणारे शिक्षकही हसत होते. तेव्हा वाटलं काहीतरी आहे. कॉमेडियन बनण्याचा माझा कोणताही विचार नव्हता. पण त्यात माझ्या वडिलांचा मोठा हात आहे.