दया बेनची सख्खी बहिणी अचानक चर्चेत, व्हायरल फोटो पाहून सगळेच चकीत

या शोमधील प्रत्येक पात्र दमदार अभिनयाच्या जोरदारवर प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत.

Updated: Mar 9, 2022, 01:54 PM IST
   दया बेनची सख्खी बहिणी अचानक चर्चेत, व्हायरल फोटो पाहून सगळेच चकीत title=

मुंबई : स्मॉल स्क्रिनवरील प्रसिद्ध मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' गेल्या 14 वर्षांपासून लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणत आहे, या शोमधील प्रत्येक पात्र दमदार अभिनयाच्या जोरदारवर प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत.

 शोमध्ये दिसणारी प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या शोच्या टीआरपीबद्दल बोलायचे तर आजही हा शो आघाडीवर आहे.

या शोमध्ये दया बेनची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वाकानी हिला सगळेच ओळखतात. आता दिशा तिच्या सख्या बहिणीमुळे चर्चेत आली आहे.

दिशा वाकानी सध्या शोमध्ये दिसत नसली तरी चाहते तिला सोशल मीडियाच्या माध्यमातून फॉलो करतात. पण जोपर्यंत ती या शोचा भाग होती तोपर्यंत तिने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले.

दिशाने आपल्या साध्या स्टाईलने सर्वांना वेड लावले. पण आता दिशा वाकानीची धाकटी बहिणीबद्दल जाणून घेण्यात देखील तिच्या चाहत्यांना उत्सुकता आहे.

आता दिशाची एक सख्खी बहिण असल्याचं बोललं जात आहे. चर्चा आहे की, ती देखील एक अभिनेत्री आहे. खुशाली असं तिचं नाव असून ती नाट्यविश्वात खूप प्रसिद्ध आहे. तिने नाटकांमध्ये काम केली आहेत.

दया बेनच्या बहिणीची काही फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण दिशाच्या कोणत्याही फॅनपेजवर अद्याप तिच्या बहिणीचा फोटो समोर आलेला नाही. 

दिशा वाकाणीलाही एक भाऊ आहे. जो तिच्यासोबत शोमध्ये काम करताना दिसला आहे. वास्तविक, तिचा भाऊ दुसरा कोणी नसून सुंदर उर्फ ​​मयूर वाकाणी आहे.

मयूर तिच्या बहिणीप्रमाणेच प्रसिद्ध आहे. दया बेनच्या व्यक्तिरेखेमुळे आजही दिशा वाकाणीची घरोघरी चर्चा होते. तिची बहीण खुशाली आणि भाऊ मयूरही याबाबतीत मागे नाहीत. 

खुशालीला ही लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. यामुळेच तिने नाट्यविश्वात नाव कमावले. दिशा वाकाणीचे वडील भीम वाकाणी हे देखील प्रसिद्ध नाटककार आहेत. अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. 

( विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही.)