'जिसने भी उसे छोड़ा...', दयाबेन पुन्हा मालिकेत परतणार नाही? एका बड्या व्यक्तीच्या पोस्टनं चर्चांना उधाण

अभिनेत्यानं केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Updated: Oct 8, 2022, 11:06 AM IST
'जिसने भी उसे छोड़ा...', दयाबेन पुन्हा मालिकेत परतणार नाही? एका बड्या व्यक्तीच्या पोस्टनं चर्चांना उधाण title=

मुंबई : छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ (Tarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. मागच्या जवळपास13 वर्षांपासून हा शो प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. तरी देखील चित्रपटाची लोकप्रियता कमी झालेली नाही. काही वर्षांपूर्वीच या शोमध्ये दयाबेनची भूमिका साकारणाऱ्या दिशा वकानीने अचानक शो सोडला. त्यानंतर सतत दिशा पुन्हा एकदा मालिकेत परतणार अशी चर्चा सुरु होती. मात्र, आता या मालिकेत तारक मेहताची भूमिका साकारणारा अभिनेता शैलेश लोढानं केलेल्या एका पोस्टमुळे ती मालिकेत पुन्हा येणार असे चित्र दिसत आहे.  

बातमीची लिंक : 'त्यानं मला हॉटेलच्या रूममध्ये...', अभिनेत्रीनं सांगितला कास्टिंग काऊचचा 'तो' धक्कादायक अनुभव

शैलेश लोढा यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये शैलेश लोढा यांनी एक शायरी लिहिली आहे. ही शायरी शेअर करत शैलेश लोढा यांनी कोणाचं नाव घेतलं नसलं तरी त्यांनी मालिकेचे निर्माते असित मोदी यांच्यावर निशाना साधल्याचे दिसत आहे. 'औरों के हक़ का जोड़ा सब उसने, किसी के मन से जुड़ कर नहीं देखा, इस बात से ही फितरत पता चलती है उसकी जिसने भी उसे छोड़ा, मुड़ कर नहीं देखा.' आता या शायरीनंतर दिशा पुन्हा एकदा मालिकेत दिसणार नाही असा इशारा देत असल्याचे सगळ्यांचे म्हणणे आहे. 

आणखी वाचा : 'सजना है मुझे' म्हणत अंजली अरोरानं शेअर केला 'हा' बोल्ड व्हिडीओ

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आणखी वाचा : वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या रावणाच्या 'त्या' लूकवर राऊतांनी दिली अशी प्रतिक्रिया

शैलेश यांच्या या पोस्टवर कमेंट करत काही नेटकऱ्यांनी शैलेश लोढा यांनी त्यांच्या शायरीच्या शेवटच्या ओळीनं शैलेश लोढा यांनी असित मोदींवर निशाना साधल्याचे म्हटले आहे. याच कारण म्हणजे गेल्या काही काळापासून मालिकेतील अनेकांनी या शोचा निरोप घेतला आहे.