तनुश्री-नाना पाटेकर आरोपांवर, मकरंद अनासपुरे स्पष्ट म्हणाले...

अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर अभिनेत्री तनुश्री दत्ताने आरोप केल्यानंतर, या प्रकणावर नाना पाटेकर यांनी अर्ध्या मिनिटाचं स्पष्टीकरण दिलं. 

Updated: Oct 9, 2018, 08:36 PM IST
तनुश्री-नाना पाटेकर आरोपांवर, मकरंद अनासपुरे स्पष्ट म्हणाले... title=

मुंबई : अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर अभिनेत्री तनुश्री दत्ताने आरोप केल्यानंतर, या प्रकणावर नाना पाटेकर यांनी अर्ध्या मिनिटाचं स्पष्टीकरण दिलं. नाना पाटेकर आणि तनुश्री दत्ता यांच्या प्रकरणावर बॉलीवूड सेलिब्रिटी काहीही स्पष्ट बोलत नसताना, अभिनेता मकरंद अनासपुरे आपली भूमिका अधिक स्पष्टपणे मांडत आहेत. मकरंद अनासपुरे यांनी नाना पाटेकर यांचं जोरदार समर्थन केलं आहे. नानांनी जे दहा वर्षापूर्वी सांगितलं आहे, जे खोटं आहे ते खोटंच आहे, याविषयी मी नाना यांच्यासोबत खंबीरपणे उभा असल्याचं मकरंद अनासपुरे यांनी म्हटलं आहे.

नानांविषयीची मकरंद अनासपुरे यांची भूमिका

माझा नाना पाटेकर यांना सपोर्ट आहे, एवढंच नाही. तर मी नाना पाटेकर यांच्या बाजूने उभा आहे. आय सपोर्ट नाना पाटेकर 'जिंदगी के बाद भी जिंदगी के साथ भी' असं अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी म्हटलं आहे.

अनासपुरे यांचे अनेक सवाल

नाना पाटेकर हा एक थिएटर आर्टिस्ट, मराठी आणि हिंदी सिनेमातील प्रसिद्ध अभिनेता आहे. या अभिनेत्याची प्रतिमा मलीन करण्याचा हा प्रयत्न आहे. ज्या कुणी बाईंनी हे आरोप केले आहेत, या बाईंना अमेरिकेचं ग्रीन कार्ड मिळालं आहे, त्यांचा काही संबंध आहे का?, मध्येच या बाईंनी मनसेचं नाव का घेतलं? असे सवाल नाना पाटेकर यांनी केले आहेत.

मीडिया ट्रायल का?

या बाईंनी मीडियाकडे न जाता, त्या सुरूवातीलाच न्यायालयात का गेल्या नाहीत, आता मीडियात नको नको ते बोलून झाल्यावर, तुम्ही आताच पोलीस स्टेशन आणि न्यायालयात जात आहात ते आधी का गेले नाहीत. या प्रकरणामागे बोलविता धनी कुणी वेगळाच आहे का ते देखील पाहिले पाहिजे, असं मकरंद अनासपुरे यांनी म्हटलं आहे.

हो नाना आहे रागीट

नाना पाटेकर यांचा स्वभाव कठोर आहे, ते रागीट आहेत हे माहितीय, पण तो माणूस वाईट नाही, एका कलावंताने हिंदीत मोठं नाव केलं आहे, खंबीर पुणे बॉलीवूडमध्ये उभे आहेत. यवतमाळच्या शेतकरी महिलांनी उस्फूर्तपणे त्यांच्या बाजूने मोर्चा काढला, तेव्हा उस्फूर्तपणे सर्वांनी नक्कीच नाना पाटेकर यांच्याबाजूने बोलण्याची गरज आहे.