भगवा फडकवत आला 'तान्हाजी'

'तान्हाजी- द अनसंग वॉरियर' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित  

Updated: Nov 15, 2019, 05:10 PM IST
भगवा फडकवत आला 'तान्हाजी' title=

मुंबई : छत्रपति शिवाजी महाराजांनी कधीही धर्मावर बोट ठेवला नाही, सतत त्यांनी फक्त आणि फक्त स्वराज्याचाच विचार केला. छत्रपती शिवाजी  महाराजांवर अनेक चित्रपटं साकारण्यात आले. या चित्रपटांच्या माध्यमातून इतिहास जगासमोर उभा राहिला. तर आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका मावळ्याची कथा रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. 'तान्हाजी- द अनसंग वॉरियर' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

वीर तान्हाजी मालुसरे यांची व्यक्तीरेखा अभिनेता अजय देवगन साकारणार आहे. 'तान्हाजी- द अनसंग वॉरियर' चित्रपटाचा  टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. १२ सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये स्वराज्यापेक्षा जास्त प्रिय महाराजांसाठी काहिच नसल्याचं दाखवण्यात आलं आहे.

'स्वराज्य से बढकर क्या?' टीझरच्या सुरवातीला असा प्रश्न विचारण्याच येत आहे. चित्रपटाचा ट्रेलर १९ नोव्हेंबर २०१९ रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे. त्यामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता चाहत्यांच्या मनात शिगेला पोहोचली आहे.  

'तान्हाजी- द अनसंग वॉरियर' चित्रपटात अजयसोबत पत्नी अभिनेत्री कजोल देखील झळकणार आहे. त्याचप्रमाणे चित्रपटात अभिनेता सैफ अली खान, शरद केळकर, आणि पंकज त्रिपाठी देखील झळकणार आहेत. 

ऐतिहासिक कथेवर आधारलेला 'तान्हाजी- द अनसंग वॉरियर' १० जानेवारी २०२० रोजी रूपेरी पडद्यावर झळकणार आहे.