कोरोना रिपोर्ट येताच तमन्ना म्हणाली....

काही दिवसांपूर्वी  'बाहुबली' फेम अभिनेत्री तमन्ना भाटीयाला करोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली होती.  

Updated: Oct 6, 2020, 04:54 PM IST
कोरोना रिपोर्ट येताच तमन्ना म्हणाली.... title=

मुंबई : काही दिवसांपूर्वी  'बाहुबली' फेम अभिनेत्री तमन्ना भाटीयाला करोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली होती. पण आता तमन्ना कोरोनासारख्या धोकादायक विषाणूच्या विळख्यातून बाहेर पडल्याचं वृत्त समोर येत आहे. तिची करोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. काही दिवसांपूर्वी तिला करोनाची सौम्य लक्षणे जाणवत होते. तिला ताप देखील होता. त्यामुळे तिने कोरोना चाचणी करून घेतली होती. तिची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याचं सांगण्यात आलं. 

दरम्यान आता कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती खुद्द तमन्नाने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. 'मी आणि माझी संपूर्ण टीम सेटवर काळजी घेत होतो. तरी देखील गेल्या अठवड्यात मला ताप आला. त्यामुळे मी कोरोना चाचणी करून घेतली. रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर माझ्यावर  हैदराबाद येथील एका खासगी रुग्णालयात सुरू होते.' असं ती म्हणाली.

आता तमन्ना पूर्णपणे बरी झाली आहे. तिला रुग्णालातून डिस्चार्ज देखील मिळाल आहे.  पण अद्यापही तिने स्वतःला क्वारंटाईन करून घेतलं आहे.  मध्यंतरी तमन्ना भाटीयाच्या आई-वडिलांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याचे सांगितले होते. खुद्द तमन्नाने सोशल मीडियाच्या माध्यमातून आई-वडिलांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती.