तैमुरने शेतातून आणला ताजा ताजा मुळा, करीना कपूर म्हणाली "दुपारी..."

करीना कपूर आणि सैफ अली खान यांचा मुलगा तैमूर रुपेरी पडद्यावर झळकला नसला तरी कायमच चर्चेत असतो. सोशल मीडियावर तैमूरचे अनेक चाहते आहेत.

Updated: Aug 30, 2022, 05:38 PM IST
तैमुरने शेतातून आणला ताजा ताजा मुळा, करीना कपूर म्हणाली "दुपारी..." title=

Taimur plucks homegrown veggies Photo Share By Kareena Kapoor: करीना कपूर आणि सैफ अली खान यांचा मुलगा तैमूर रुपेरी पडद्यावर झळकला नसला तरी कायमच चर्चेत असतो. सोशल मीडियावर तैमूरचे अनेक चाहते आहेत. त्यामुळे तैमूरबाबत कायमच उत्सुकता असते. करीना कपूर आणि सैफ अली खान आपल्या बिझी शेड्युलमधून वेळ काढून आनंदाने सुट्ट्या घालवत आहेत. 27 ऑगस्टला सैफ-करीना आपल्या दोन्ही मुलांसोबत पतौडी पॅलेसला गेले आहेत. या ठिकाणचे व्हिडीओ करीना कपूर सोशल मीडियावर शेअर करत आहे. करीनाने नुकताच तैमूरचा एक फोटो शेअर केला आहे. यात तैमूर शेतातून मुळा काढताना दिसत आहे. 

तैमूरचे फोटो शेअर करत आई करीनाने लिहिले आहे की,  "गरम गरम मूली के परांठे with घी for lunch". यानंतर अनेक युजर्स आणि त्याच्या चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव सुरु केला आहे. तैमूरची आत्या सबा पतौडी हीने या फोटोवर प्रतिक्रिया दिली आहे. सबाने लिहिलं आहे की, टिमटिम म्हणजेच तैमूरचा अभिमान आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

तैमूरच्या फोटोंवर सोशल मीडियावर चाहते प्रतिक्रिया देत आहेत. या फोटोंपूर्वी करीना कपूर खानने सैफ अली खानसोबत बॅडमिंटन खेळतानाचा व्हिडीओ शेअर केला होता.  करीना कपूर आणि सैफ अली खान यांनी 2012 मध्ये लग्न केले आणि त्यांना दोन मुलं आहेत. तैमूर 5 वर्षांचा, तर जेह एक वर्षाचा आहे.