शाहरुख खानच्या मुलानं 'या' अभिनेत्रीच्या बहिणीसोबत केलं बर्थडे सेलिब्रेशन, Photo Viral

अभिनेत्री श्रुती चौहानच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या पार्टीचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत. 

Updated: Aug 30, 2022, 05:12 PM IST
शाहरुख खानच्या मुलानं 'या' अभिनेत्रीच्या बहिणीसोबत केलं बर्थडे सेलिब्रेशन, Photo Viral title=

Shahrukh Khan Son Seen With Katrina Kaif's Sister:  बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान आणि कतरिना कैफ यांचे रुपेरी पडद्यासोबत वैयक्तिक आयुष्यातही चांगले संबंध आहे. या दोघांची जोडी 'जब तक है जान' आणि 'झिरो' या चित्रपटात दिसली होती. आता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान आणि कतरिना कैफची बहीण इसाबेल यांच्या फोटोमुळे सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे. आर्यन खान आणि इसाबेल कैफ हे दोघेही एका बर्डथे पार्टीत एकत्र आले होते. आर्यन खानने रविवारी रात्री कतरिना कैफची बहीण इसाबेल, छोट्या पडद्यावरील अभिनेता करण टॅकर आणि इतर मित्रांसोबत मुंबईत पार्टी केली. अभिनेत्री श्रुती चौहानच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या पार्टीचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत. 

आर्यन खान काळ्या रंगाचा टी-शर्ट, डेनिम्स आणि पिवळ्या जॅकेटमध्ये होता. इसाबेल लाईट रंगाचा ड्रेस परिधान केला होता. आर्यन आणि इसाबेलासोबत वाढदिवस साजरा केल्यानंतर श्रुतीने इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली आहे.

“माझ्यावर बरेच लोक मनापासून प्रेम करतात, म्हणून मी जगातील सर्वात भाग्यवान मुलगी आहे.  माझ्या सर्व जीवलग मित्रांचे आभार..हे मित्र माझ्या कुटुंबासारखे आहेत आणि ज्यांनी मला शुभेच्छा दिल्या. माझ्या जवळच्या मित्रांसोबत वेळ घालवणं याच्यापेक्षा दुसरं काय हवं! ज्यांना टॅग करणं राहिलं आहे, अशी सर्वांची मी माफी मागते. जे आले आणि जे आले नाहीत त्या सर्वांवर प्रेम. ते माझ्यासाठी खूप काही आहेत! धन्यवाद सर्वांचे आभार.” असं श्रुतीने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

इसाबेलने सूरज पांचोलीसोबत 'टाईम टू डान्स' या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले आहे. त्यानंतर ती 'सुस्वागतम् खुशामदीद' या चित्रपटात दिसणार आहे.