TMOC : दया बेनसोबत गरबा खेळण्याचा मोह Shah Rukh Khanला ही आवरेना....पाहा व्हायरल व्हिडीओ

तारक मेहता का उल्टा चष्मा 13 वर्षांपासून प्रेक्षकांचा पसंतीचा शो राहिला आहे.

Updated: Sep 8, 2021, 05:43 PM IST
TMOC : दया बेनसोबत गरबा खेळण्याचा मोह Shah Rukh Khanला ही आवरेना....पाहा व्हायरल व्हिडीओ title=

मुंबई : तारक मेहता का उल्टा चष्मा 13 वर्षांपासून प्रेक्षकांचा पसंतीचा शो राहिला आहे, या शोचे प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. त्यात जेठालाल आणि दयाबेन यांचा सर्वात मोठा चाहता वर्ग आहे, त्यामुळे सर्वत्र यांची चर्चा सुरू असते. गोकुळधाम सोसायटीमध्ये आपल्याला नेहमीच दयाबेनचा गरबा पाहायला मिळतो, कारण दया बेन म्हणजेच दिशा वाकाणी या शोमध्ये तिला झालेला आनंद हा डान्सच्या माध्यमातून साजरा करते. 

त्यामुळे तिला गरबा क्वीन देखील बोलले जाते आणि अनेक लोकं दया बेनच्या गरब्याचे फॅन आहेत. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल परंतु बॉलीवूडचा बादशाह शाहरुक खान देखील दया बेनच्या गरब्याचा फॅन आहे आणि त्यामुळे तो तिच्याकडून गरबा खेळायला शिकला.

गोकुळधाम रहिवासी शाहरुखसोबत मजा करतात

ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा शाहरुख खान त्याच्या रईस चित्रपटाच्या प्रमोशनच्या संदर्भात काही वर्षांपूर्वी गोकुळधाम सोसायटीमध्ये पोहोचला होता. शाहरुख इथे आल्यावर उत्सवाचे वातावरण होते. शाहरुखच्या स्टाईलची कॉपी करण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक होता. परंतु दया बेनने मात्र शाहरुखला आपल्या गरब्याचं वेड लावलं होतं, ज्यामुळे शाहरुखने सेटवर गरबा खेळला आणि सणामुळे आता हा शाहरुखचा जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे.

जेठाचा गरबाही मस्त

व्हिडाओमध्ये तुम्हा पाहू शकता की, दया शाहरुखला गरबा कसा खेळायचा त्यासंदर्भात सांगत असते आणि त्याला गरबा शिकवण्यात पूर्णपणे व्यस्त होते. पण शाहरुखच्या खांद्याला झालेली वेदना पाहाता ती, शाहरुखला म्हणते की, तू टप्पूच्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाक. मग जेठालाल सरळ उभा राहतो आणि फक्त मान हलवू लागतो. ते पाहून शाहरुख त्याची कॉपी करतो.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

लोक दयाची वाट पाहत आहेत

2017 च्या वर्षापासून दया बेन म्हणजेच दिशा वाकाणी शोमधून गायब आहेत. आतापर्यंत तिच्या जागी दुसरी अभिनेत्री आली नाही. परंतु आजही दिशा वाकाणीचे जुने व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे.