TMKOC : हे मॉं माताजी... म्हणणारी 'दयाबेन' मानधन न घेताच करायची काम, पण असं का?

एकेकाळी 'दयाबेन' मानधन न घेता करायची काम, काय वेळ आली होती जे तिला करावं लागलं...  

Updated: Dec 5, 2022, 11:39 AM IST
TMKOC : हे मॉं माताजी... म्हणणारी 'दयाबेन' मानधन न घेताच करायची काम, पण असं का? title=
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah tv industry famous actress Disha Vakani used to work without taking remuneration nz

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : टीव्हीचा (TV) प्रसिद्ध कॉमेडी मालिका (Comedy Show) 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) गेल्या 14  वर्षांपासून ही चाहत्यांचे मनोरंजन (Entertainment) करत आहे. ही मालिकेतील प्रत्येक पात्र चाहत्यांच्या मनात घर करुन गेले आहे. 14 वर्षांनंतरही या शोची लोकप्रियता कमी झालेली नाही. आजही हा शो प्रेक्षकांना खूप आवडतो. या शो मधील प्रत्येक कलाकाराने त्यांच्या दमदार अभिनयाने स्वत:ची ओळख निर्माण केली आहे.  या शोमध्ये 'दयाबेन'ची (Dayaben) भूमिका साकारून दिशा वाकाणीने (Disha Vakani) खूप लोकप्रियता मिळवली. त्यांच्या अभिनयाचे प्रेक्षक वेडे झाले होते. आता दिशा वाकाणीने या शोचा निराप घेतला असला तरी, प्रेक्षकांना अजूनही दिशा वाकाणीला 'दयाबेन'च्या भूमिकेत पाहायचे आहे. (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah tv industry famous actress Disha Vakani used to work without taking remuneration nz)

दयाबेनच्या व्यक्तिरेखेतून लोकप्रियता

दिशा वकानी गेल्या 6 वर्षांपासून शोपासून दूर आहे. 2017 मध्ये तिने तिच्या गरोदरपणात शो सोडला होता. त्याचवेळी तिने मे महिन्यात मुलाला जन्म दिला आहे. दयाबेनच्या भूमिकेतील दिशा चाहत्यांना खूप आवडली असून आता ते नव्या दयाबेनची वाट पाहत आहेत. आज आम्ही तुम्हाला दिशा वाकाणीशी संबंधित काही गोष्टी सांगणार आहोत.

तुम्ही कधी फीशिवाय काम केले आहे का?

आज दिशा वाकाणीने इडंस्ट्रीत स्वत:ची ओळख जरी निर्माण केली असली तरी एक काळ असा होता जेव्हा ती पैशाशिवाय काम करायची. हे माहीत असणारे फार कमी लोक असतील. दिशानं जेव्हा तिच्या करिअरला सुरुवात करत होती, त्यावेळी दिशा वाकाणी कोणतेही शुल्क न घेता काम करत होती.

हे ही वाचा - Viral Video : माधुरी दीक्षितनंतर आता Pakistani Girl च्या व्हायरल डान्सचं Mr. Bean फॅन

 

दिशा अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसली

अभिनेत्री तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्येही दिसली आहे. सध्या दिशा वाकानी तिच्या घरच्यांमध्ये व्यस्त आहे. दिशाने गुजराती थिएटरमध्येही काम केले आहे. मात्र, मुंबईत आल्यावर तिला चित्रपटात काम मिळण्यासाठी अनेक मेहनत घ्यावी लागली. यादरम्यान अनेकवेळा ती फी न घेता काम करत होती.