'तारक मेहता का उल्टा चश्मा'वर बंदी येण्याची शक्यता!

पदार्पणापासूनच लोकप्रियतेचा उच्चांक प्रस्थापीत केलेल्या 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी आहे. या मालिकेवर बंदी घालण्यात यावी अशी जोरदार मागणी पुढे येत आहे. ही मागणी मान्य करून खरोखरच मालिका बंद होणार का याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Sep 17, 2017, 01:54 PM IST
'तारक मेहता का उल्टा चश्मा'वर बंदी येण्याची शक्यता! title=

नवी दिल्ली : पदार्पणापासूनच लोकप्रियतेचा उच्चांक प्रस्थापीत केलेल्या 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी आहे. या मालिकेवर बंदी घालण्यात यावी अशी जोरदार मागणी पुढे येत आहे. ही मागणी मान्य करून खरोखरच मालिका बंद होणार का याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, मालिकेतील एका भागात दाखवल्या गेलेल्या एका दृश्यामुळे या मालिकेवरच बंदी घातली जावी अशी मागणी केली जात आहे. शिरोमणी गुरूद्वारा प्रबंधक कमिटीने (एसजीपीसी) ही मागणी केली आहे. मालिकेतील  एका दृश्यात 'ईश्वरनिंदा' केल्याचा आरोप करत 'तारक मेहता का उल्टा चश्मा'वर तत्काळ बंदी घालण्यात यावी, असे 'एसजीपीसी'ची मागणी आहे. 'तारक मेहता का उल्टा चश्मा'चा पहिला एपिसोड २८ जुलै २००८ मध्ये प्रसारित झाला होता. तेव्हापासून ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे.

'एसजीपीसी'चे प्रमुख कृपाल सिंह बांदुगर यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, या मालिकेत शिखांचे दहावे गुरू गुरू गोविंदसिंग यांच्याबाबत आक्षेपार्ह चित्रिकरण केले आहे. असे करणे 'शिख सिद्धांता'च्या विरोधात आहे. कोणताही अभिनेता किंवा चरित्र शिखांचे दहावे गुरू गोविंद सिंह यांची बरोबरी करू शकत नाही. हा अक्षम्य गुन्हा आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच सोनी टीव्हीवरील एक शो 'पहारेदार पिया की'वर बंदी घालण्यासाठी प्रेक्षकांमधील एका वर्गाने ऑनलाईन पिटीश सुरू केली होती. ज्यानंत हा शो बंद करण्यात आला होता. दरम्यान, 'तारक मेहता का उल्टा चश्मा'वर करण्यात आलेल्या बंदीच्या मागणीवर काय निर्णय घेतला जातो याबाबत उत्सुकता आहे.