Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये ‘दयाबेन’ परतणार!

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah:  एकापाठोपाठ एक अशा अनेक कलाकारांनी मालिकेला गुडबाय म्हटले असून, हे नेमके का घडत आहे? तसेच प्रसूती रजेवर गेलेली ‘दयाबेन’ अर्थात अभिनेत्री दिशा वाकाणी पुन्हा या मालिकेत परतणार असल्याची चर्चांनी जोर धरला आहे.   

Updated: Feb 15, 2023, 10:35 AM IST
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये ‘दयाबेन’ परतणार!

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (TMKOC) ही छोट्या पडद्यावरील प्रचंड लोकप्रिय विनोदी मालिका ठरली आहे. या मालिकेने गेली 14 वर्षे प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केलं आहे. या मालिकेमुळे कलाकारांना मोठी प्रसिद्धी मिळाली आहे. मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनावर आपली एक विशिष्ट छाप पाडली आहे. दयाबेन ते तारक मेहता सर्वच कलाकार तुफान लोकप्रिय झाले आहेत. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये अनेक कलाकारांनी या मालिकेला रामराम केला आहे. यामध्ये दयाबेन साकारणाऱ्या दिशा वकानीपासून ते तारक मेहता साकारणाऱ्या शैलेश लोढापर्यंत अनेक मुख्य कलाकारांनी मालिका सोडली आहे. मात्र याचसंदर्भात एक बातमी समोर येत असून, निर्मात्यांनी शो सोडलेल्या कलाकारांना पूर्ण पैसे दिलेले नाहीत. यामध्ये शैलेश लोढा (shailesh lodha) यांचेही नाव असल्याचे सांगण्यात आले. या संपूर्ण वादावर शोचे निर्माते असित मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.   

'दयाबेन' म्हणजेच ​​दिशा वकानीने मालिका सोडून जवळजवळ तीन वर्षे उलटली आहेत. परंतु आजही प्रेक्षक आतुरतेने तिची वाट पाहात आहेत. मालिकेमध्ये अशा अनेक गोष्टी घडल्या जे पाहून प्रेक्षकांना वाटलं की आता दया परत येईल. परंतु असं काहीच घडलं नाही. तरीसुद्धा मालिकेत दयाबेन परतणार अशी प्रेक्षकांना अपेक्षा आहे. दरम्यान सोशल मीडियावर सतत दयाबेनच्या भूमिकेसाठी निवड झाल्याचं सांगत अनेक अभिनेत्रींच्या नावाची चर्चा होत असते. परंतु दोन्हीपैकी अजून काहीच घडलेलं नाहीय. असे असताना या मालिकेतून स्टार्स सतत शो सोडत आहेत. तसेच आतापर्यंत सोडून गेलेल्या कलाकारांना अद्याप संपूर्ण पगार मिळाला नाही,अशी माहिती समोर येतं आहे. यावर तारक मेहता का उल्टा चष्माच्या सेटवर मीडिया मीटिंग दरम्यान असित मोदीने शोशी संबंधित अनेक मुद्द्यांवर उत्तरे दिली.

वाचा: शुभमन गिल कोणाला डेट करतोय? फोटो शेअर करत 'सार' काही सांगून टाकलं... 

काय म्हणाले असित मोदी? 

दरम्यान असित मोदीने यांनी सांगितले की, आम्ही पैसे दिले नाही ही माहिती खरी नाही. एखाद्याचे कष्टाचे पैसे माझ्या खिशात ठेवून मी काय करू? देवाने मला खूप काही दिले आहे, सर्वात जास्त त्याने मला प्रेम दिले आहे. मी लोकांना पैसे देऊ नयेत असे काही नाही, मी लोकांना हसवतो याचा मला आनंद आहे.

शो सोडणाऱ्या स्टार्सवर काय म्हणाले असित मोदी? 

स्टारकास्ट शोमधून बाहेर पडल्यावर असित मोदी म्हणाले - तुम्ही लोकांनी फक्त सांगितले की काही लोक सोडून  जातात. पण गेल्या 15 वर्षांपासूनचा हा प्रवास सुरू आहे. आम्ही 2008 मध्ये शो सुरू केला. बहुतेक कलाकार तेच आहेत, काही माणसं बदलली आहेत, त्यामुळे सगळे वेगळे आहेत. आमच्या शोमध्ये कधीही अशा प्रकारचे भांडण किंवा वाद नाही. मी नेहमी देवाला प्रार्थना करतो की माझी ही टीम एका कुटुंबासारखी असू दे... 

दयाबेन कधी परत येणार?

शोमध्ये दयाबेनच्या पुनरागमनावर असित मोदी म्हणाले - दिशा वाकानी आली तर खूप चांगले आहे. पण दिशा वाकानी यांना कौटुंबिक जीवन आहे. ती तिच्या कौटुंबिक जीवनाला प्राधान्य देत आहे, तिला येणे थोडे कठीण जात आहे. पण आता टप्पू आल्याने दयाबेनही लवकरच येणार आहे. दया भाभीचा तोच गरबा, दांडिया हे सगळे गोकुळधाम सोसायटीत सुरू होणार आहे. थोडा वेळ थांबा. दया भाभी लवकरच दिसणार आहे.